महिला SPचीं कमाल, रात्री 12 वाजता भुकेल्या मजुरांना स्वयंपाक करून दिलं जेवण

महिला SPचीं कमाल, रात्री 12 वाजता भुकेल्या मजुरांना स्वयंपाक करून दिलं जेवण

तेव्हा त्या भुकेल्या महिलांची व्यस्था जाणून त्यांनी स्वत: रात्री बारा वाजता लेमन राईस करून त्या महिलांसाठी त्या घेऊन गेल्या आणि त्यांना खाऊ घातलं.

  • Share this:

विशाखापट्टनम् 18 मे: लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न देशभर गाजत आहे. कामं बंद असल्याने शहरांमधले मजूर आपापल्या गावी जात आहेत. लाखो मजूर स्थलांतर करत असून उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये लाखो मजूर परतत आहेत. तर राज्यातल्या एका जिल्ह्यांमधून दुसऱ्या जिल्ह्यांमध्येही मजूर परतत आहेत. आंध्र प्रदेशातल्या विजयनगरच्या एस.पी. बी. राजाकुमारी यांनी रात्री १२ वाजता मजुरांसाठी स्वयंपाक करून त्यांना जेवण दिलं. त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियावर सगळे कौतुक करत आहे.

आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्यातून ११ महिला या आपल्या गावाकडे जात होत्या. विजयनगरला आल्यानंतर त्यांनी थेट तिथल्या एसपी बी राजाकुमारी यांना फोन केला आणि आपलं गाऱ्हाणं सांगितलं. त्या सतत तीन दिवस चालत निघाल्या होत्या. आणि खायलाही त्यांना काही मिळालं नव्हतं. राजाकुमारी यांनी आपल्या अधिकाऱ्यांना त्या मजुरांसाठी काही व्यवस्था होते का ते पाहण्यास सांगितलं. मात्र लॉकडाऊनमुळे काहीही शक्य झालं नाही.

तेव्हा त्या भुकेल्या महिलांची व्यस्था जाणून त्यांनी स्वत: रात्री बारा वाजता लेमन राईस करून त्या महिलांसाठी त्या घेऊन गेल्या आणि त्यांना खाऊ घातलं. त्या सगळ्या महिलांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांना धन्यवाद दिलेत.

  Smt. B. Raja Kumari, IPS, SP, VZM dist received a phone call from a migrant woman at midnight, on that she prepared food at mid night, took them to quorantaine center and feeded them at midnight of 15/16-05-2020. pic.twitter.com/gKLDWqJD5d

— vizianagaramdistrictpolice (@vizianagaramdi2) May 16, 2020

देशात आजपासून चौथ्या लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ५ हजार नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. पुढचे दोन महिने भारतासाठी अतिशय महत्त्वाचे असून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य आकडे लक्षात घेऊन सरकारनेही तयारी सुरू केली आहे. जुलैपर्यंत तब्बल १ कोटी लोकांच्या टेस्ट करण्याचं टार्गेट आखण्यात आलं आहे.

‘घरी चला’, कुटुंबीय सतत म्हणत होतं; मुंबईहून परतलेल्या 10 चालकांनी दिला नकार

देशात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याच प्रमाणात सरकारने तयारी सुरू केली आहे. आत्तापर्यंतचा ग्राफ लक्षात घेता काही मॉडेल्सवर तज्ज्ञ काम करत आहेत. त्यांच्या मतानुसार जुलै महिन्यात ५ ते ७ लाख नवे रुग्ण येऊ शकतात. तर ऑगस्टमध्ये हाच आकडा १० लाखांपर्यंत जाऊ शकतो. ही वाढ लक्षात घेता सरकारने तयारी सुरू केली आहे.

‘POK मधल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ल्यासाठी Indian Air Force तयार’

एवढ्या बेड्सची उपलब्धता, त्यांच्यासाठी लागणारी उपकरणं, मनुष्यबळ, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण अशा सर्व गोष्टींची तयारी करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत.

First published: May 18, 2020, 7:55 PM IST

ताज्या बातम्या