Home /News /maharashtra /

मातीचा ढिगारा खचल्याने 4 महिला कामगारांचा मृत्यू, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

मातीचा ढिगारा खचल्याने 4 महिला कामगारांचा मृत्यू, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

नागपूरमध्ये मातीचा ढिगारा कोसळून 4 महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 3 महिला जखमी झाल्या आहेत.

    नागपूर, 22 फेब्रुवारी : नागपूर जिल्ह्यातील आदासा पटकाखेडी गावाजवळ शुक्रवारी सकाळी मातीचा ढिगारा कोसळून 4 महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 3 महिला जखमी झाल्या आहेत. बांधकामादरम्यान खोदकाम सुरू असताना ही घटना घडली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही महिला मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात राहत होत्या. अनुसया हिरदय टेकाम (45), वर्षा शामलाल माडवी (26), सुनीता कैलाश (35) आणि रामप्यारी उदयसिंह काकोरिया (18) यासोबतच अन्य 30 जण मिळून बांधकाम करत होते. यावेळी ही घटना घडनू या तिघींचाही मृत्यू झाला आहे. वारीस पठाण यांचा पुतळा जाळताना शिवसैनिक पेटला, पाहा हा धक्कादायक VIDEO सावनेर तालुक्यातील पटकाखेडी आदासा शिव शिवारातील नाल्यावर लघु पाटबंधारे विभागाचं बंधारा बांधण्याच काम सुरू होतं. सकाळी 8 वाजता कामगार काम कऱण्यासाठी आले. महाशिवरात्री असल्याने कामगार लवकर काम आटपून परत जाण्याच्या बेतात होते. मात्र अचानक मातीचा ढिगारा खचला आणि त्या ढिगाऱ्याखाली दबून या महिलांचा मृत्यू झाला आणि 3 महिला जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांचे मृतदेह लगेचच मध्यप्रदेशला पाठवण्यात आले आहेत. 'पंढरी शेठ फडके..'ची किक्रेट मैदानात गोळीबार करत एंट्री अन् उधळल्या नोट्या VIDEO सावनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक कोळी यांनी सांगितल्याप्रमाणे ठेकेदार मनदीप चौधरी आणि इंजिनियर जगदीश प्रसाद यांच्या विरोधात बेपर्वाईमुळे मृत्यू झाल्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याआधीही अनेकदा ठेकेदारांच्या बेपर्वाईमुळे निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. जीव गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते. मात्र अशा ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे कुटुंबाच पोट भरण्यासाठी कष्ट करणाऱ्याला आपल्या प्राणाला मुकावं लागतं. यापुढे कमरखालचेच वार, औरंगाबादमध्ये भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक करत कार फोडली
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Nagpur, Nagpur accident

    पुढील बातम्या