मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक! ‘प्रहार’चे तुषार पुंडकर यांची गोळी झाडून हत्या

धक्कादायक! ‘प्रहार’चे तुषार पुंडकर यांची गोळी झाडून हत्या

रात्री साधारण 11 च्या सुमारास त्यांच्यावर पोलीस वसाहतीत गोळ्या घालण्यात आल्या. काही वेळापूर्वी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

रात्री साधारण 11 च्या सुमारास त्यांच्यावर पोलीस वसाहतीत गोळ्या घालण्यात आल्या. काही वेळापूर्वी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

रात्री साधारण 11 च्या सुमारास त्यांच्यावर पोलीस वसाहतीत गोळ्या घालण्यात आल्या. काही वेळापूर्वी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

अकोट, 22 फेब्रुवारी : 'प्रहार जनशक्ती पक्षा'चे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर शुक्रवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला होता. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काल झालेल्या गोळीबारात पुंडकर गंभीर जखमी झाले होते. काल रात्रीपासून त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या पाठीला दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांनी देशी कट्ट्याचा वापर केला होता अशी माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप हल्ल्याचे कारण कळलेले नाही. साधारण रात्री 11.30 वाजता त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना आमदार नितीन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावडे यांनी पुंडकर यांच्या प्रकृतीची पाहणी केली होती. मध्यरात्री पालकमंत्री बच्चू कडूदेखील रुग्णालयात दाखल झाले होते.

अकोट येथील पोलीस वसाहतीत केला हल्ला

अकोट येथील पोलीस वसाहतीत असलेल्या दूध डेअरीजवळ तुषार पुंडकर उभे होते. कोणीतरी आपल्या मागे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी त्यांनी पोलीस वसाहतीच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी मारेकरी त्यांच्या मागे धावू लागले व त्यांनी पुंडकरांच्या पाठीत दोन गोळ्या घातल्या. यानंतर पुंडकर जागीच कोसळले. लागलीच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुंडकर यांना मारण्यासाठी देशी कट्ट्याचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बंदोबस्त लावला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. पुंडकर यांच्यावर ज्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते तेथेच त्यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. यावेळी रुग्णालयात प्रहारचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने रुग्णालयाच्या बाहेर उभे आहेत.

First published:
top videos

    Tags: Akola, Crime, Dead