Home /News /maharashtra /

भीती वाढली! ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचा शिरकाव, 37 उमेदवारांसह 13 कर्मचारी पॉझिटिव्ह

भीती वाढली! ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचा शिरकाव, 37 उमेदवारांसह 13 कर्मचारी पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Election 2021) रणधुमाळी सुरु झाली आहे.

अमरावती, 29 डिसेंबर: महाराष्ट्रात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Election 2021) रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. मात्र, त्याआधीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचा (Coronavirus) शिरकाव झाल्याचं दिसून आलं आहे. अमरावती जिल्ह्यात 37 उमेदवारांसह 13 कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हेही वाचा..राजकारण तापलं! शिवसेनेतर्फे 'या' शहरातही झळकले #wesupportSanjayRaut चे बॅनर अमरावती जिल्ह्यातील एकूण 553 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातून 3 हजार 547 अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारांना आपले नामनिर्देश अर्ज दाखल करताना कोरोना चाचणी केल्याचा अहवाल सादर करणे अनिवार्य आहे, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत. उमेदवारांची कोरोना चाचणी करताना जिल्ह्यात 37 उमेदवार कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यासोबतच 13 निवडणूक कर्मचारीसुद्धा कोरोनाबाधित आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मेळघाटमधील एकट्या धारणी तालुक्यात तब्बल 27 उमेदवार बाधित आढळले तर तिवसा येथे 8 आणि अमरावतीमध्ये 7 असे एकूण 37 उमेदवार बाधित आढळले आहेत. त्यामुळे बाधित उमेदवारांना 17 दिवसांसाठी विलगिकरण कक्षात पाठवण्यात आले आहेत. कोरोनाबाधित उमेदवाराच्या प्रचारार्थ उमेदवाराने निवडलेल्या व्यक्तीची नेमणूक करून प्रचार करण्यास जिल्हा निवडणूक विभागाने परवानगी दिली आहे. कोरोना काळात निवडणुका होत असल्यानं योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते आहे. येत्या 15 जानेवारी ला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग सज्ज असल्याचं चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. दरम्यान, राज्यात 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. हेही वाचा...निवडणुका घ्यायच्याच कशाला? सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटींची लागली बोली असा आहे निवडणूक कार्यक्रम.. -15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील -23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी -31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी -4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी -15 जानेवारी मतदान -18 जानेवारी मतमोजणी
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Maharashtra

पुढील बातम्या