मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशिकनंतर आता नागपूर! नायलॉन मांजानं कापला 12 वीच्या विद्यार्थ्याचा गळा

नाशिकनंतर आता नागपूर! नायलॉन मांजानं कापला 12 वीच्या विद्यार्थ्याचा गळा

नायलॉन मांजा एका विद्यार्थ्याच्या गळ्यात अडकल्यामुळे त्या विद्यार्थ्याचा गळा कापला गेला.

नायलॉन मांजा एका विद्यार्थ्याच्या गळ्यात अडकल्यामुळे त्या विद्यार्थ्याचा गळा कापला गेला.

नायलॉन मांजा एका विद्यार्थ्याच्या गळ्यात अडकल्यामुळे त्या विद्यार्थ्याचा गळा कापला गेला.

  • Published by:  Sandip Parolekar
नागपूर, 31 डिसेंबर: नाशिकमध्ये (Nashik) नायलॉन मांजानं (nylon manza) एका महिलेचा बळी घेतल्याची घटना ताजी असताना नागपूर शहरात अशीच घटना घडली आहे. नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यामुळे एका विद्यार्थ्याचा गळा कापला गेला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नायलॉन मांजावर  बंदी असतानासुद्धा नागपूर शहरात (Nagpur city) मोठ्या धडाक्यात विक्री सुरू आहे. अनेकजण नायलॉन मांजानं पतंग (Kite) उडवत आहेत. त्यामुळे अनेक अपघातही घडत आहेत. हेही वाचा...कशेडी घाटात बस 50 फूट खोल दरीत कोसळली, एक ठार, 32 प्रवासी जखमी आदित्य संतोष भारद्वाज (वय-17) असे जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. गोधनी परिसरात राहणारा आदित्य हा 12 वीचा विद्यार्थी आहे. तो बाईकवरून क्लासला जात होता. तेव्हा ही घटना घडली. गोधनी-मानकापूर रोडवरील नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला गुंडाळला गेला. दुचाकी वेगात असल्यामुळे गळा कापला गेला आणि तो गाडीवरून पडला आणि गंभीर जखमी झाला. आदित्यला नागरिकांनी तात्काळ गोधनी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला मानकापूर चौकातील अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आदित्यच्या गळा जास्तच चिरला गेल्याने तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे प्राण थोडक्यात बचावले. त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. दरम्यान, राज्य सरकारनं 1986 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. बंदी असतानाही बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू आहे. या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे. हेही वाचा...'आई वडिलांना मारलं, आता दफन करु द्या,' मुलाची पोलिसांना विनंती - Video मकर संक्रांती दरम्यान बाजारपेठेत मांजा व पतंग खरेदीसाठी गर्दी झाली आहे. मात्र पतंग प्रेमींमध्ये चायना व नायलॉन मांजाची मागणी वाढली आहे. गेल्यावर्षी देखील मांजामुळे अनेक अपघात झाल्यानंतरही यंदा या मांजाची मागणी होत आहे; परंतु हा मांजा नागरिकांसह पशुपक्ष्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे. नागरिकांना चालताना किंवा वाहन चालवताना जीव मुठीत घेऊ न रस्त्याने जावे लागते. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी किंवा प्रसंगी मृत्युमुखी पडतात.
First published:

पुढील बातम्या