जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / प्लॅटफॉर्मवरुन दागिन्यांनी भरलेली बॅग चोरी; 24 तासांत पोलिसांनी आवळल्या बाब्याच्या मुसक्या

प्लॅटफॉर्मवरुन दागिन्यांनी भरलेली बॅग चोरी; 24 तासांत पोलिसांनी आवळल्या बाब्याच्या मुसक्या

प्लॅटफॉर्मवरुन दागिन्यांनी भरलेली बॅग चोरी; 24 तासांत पोलिसांनी आवळल्या बाब्याच्या मुसक्या

चोरट्याने गर्दीचा फायदा घेत ही बॅग घेवून फरार झाला होता. यानंतर पटेल यांनी वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नालासोपारा, 8 जुलै : एरव्ही लोकल ट्रेनमध्ये चोरीला गेलेले मोबाइल किंवा इतर वस्तू मिळणे अवघडच असते. मात्र वसई रोड रेल्वे स्टेशन फलाटावरील सॅकबॅग चोरी करणाऱ्या आरोपीला 24 तासांत गजाआड केलं आहे. आरोपीकडून रेल्वे पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. वसईच्या वसई रोड रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 5 वर आशिष पटेल यांचे मित्र आणि 4 ते 5 अनोळखी गाडीत चढण्या-उतरण्यावरून शाब्दीक बाचाबाची झाली. हा वाद सोडवत असतांना पटेल यांची खांद्याला लावलेली सोन्याचे दागिने आणि मोबाईल असलेली सॅकबॅग फलाटावर पडली. चोरट्याने गर्दीचा फायदा घेत ही बॅग घेवून फरार झाला होता. यानंतर पटेल यांनी वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खलीद, पोलीस उपायुक्त प्रदिप चव्हाण पश्चिम परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगवले, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश लाहिगुडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विरनाथ माने याचं पथक बनवून रेल्वे स्टेशन वरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. शिक्षिकेचं विद्यार्थ्यांसोबत घृणास्पद कृत्य, शाळेच्या CCTV मध्ये रेकॉर्ड झाला धक्कादायक VIDEO पोलिसांना रेकॉर्ड असलेल्या गुन्हेगारांची यादी तपासून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या चेंबुरकर याच्यावर संशय बळावला. गुप्त खबऱ्या मार्फत माहिती घेवून पोलिसांनी सापळा रचून आरोपी अमय गिरीश चेंबुरकर उर्फ बाब्या याला अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी 1,39,836 रुपये किंमतीचे सोन्याची चैन, लॉकेट, मोबाईल फोन, पटेल यांचे कंपनीचे ओळखपत्र आणि सॅकबॅग इत्यादी समान जप्त केले. अनेकदा रेल्वेत अनेकांचे मोबाइल, पाकीट तसेच मौल्यवान वस्तू चोरी होत असतात. मात्र त्या परत मिळण्याच्या घटना अपवादात्मक सापडतील. पण वसईच्या लोहमार्ग पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेवून पथके तयार करून आरोपीचा कसून शोध घेतला. अखेर त्यांना चोरट्याचा सुगावा लागला आणि त्याला अखेर गजाआड करून लंपास केलेले दागिने पटेल यांना परत मिळवून दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cctv , crime , vasai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात