कन्हैया खंडेलवाल, (प्रतिनिधी)
हिंगोली, 6 ऑगस्ट: हिंगोली जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीला विरोध करून लॉकडाऊन उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या वंचित बहुजन पदाधिकाऱ्यांवर बुधवारी गुन्हे दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी गुरूवारी वंचित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लॉकडाऊन उधळून लावण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी 11 जणांना अटक केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी 6 ते 19 ऑगस्ट दरम्यान टाळेबंदी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 4 ऑगस्ट रोजी हिंगोली शहरातील गांधी चौक येथे आंदोलन करून आपण लॉकडाऊन पाळणार नाही, असे जाहीर करून आंदोलन केले होते.
हेही वाचा...धक्कादायक! हत्या केलेल्या गुन्हेगारानं कारागृहाच्या बॅरेकमध्येच लावला गळफास
याबाबत पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथ रोग प्रतिबंध कायद्याखाली गुन्हे दाखल केले होते. तर आज पुन्हा गांधी चौक येथे टाळेबंदी विरोधात आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते जमा झाले होते. वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक भागात चारचाकी गाड्यावर चपलांचे दुकान टाकून लॉकडाऊन उधळून लावला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, मी लॉकडाऊन पाळणार नाही, बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्ते त्या ठिकाणी आंदोलन करीत होते. कार्यकर्त्यांचे आंदोलन चालू असताना पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात घेऊन गेले.
लॉकडाऊन तोडल्याप्रकरणी केल्याप्रकरणी रवींद्र वाढे, ज्योतीपाल रणवीर, प्रल्हाद धाबे, योगेश नरवाडे, बबन भुक्तर, प्रा. लोणकर यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली.
आता लॉकडाउन वाढवू नका, नाहीतर लोकं उपाशी मरतील - प्रकाश आंबेडकर pic.twitter.com/uCYKLP9QcA
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2020
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत कोरोनामुळे होणार मृत्यू दर आटोक्यात आणू, असं वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानावर 'उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका', अशी जळजळीत टीका वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. राज्यातील सर्व व्यवहार हे पूर्वपदावर आणले पाहिजे. राज्यात लॉकडाऊन वाढवू नका', अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.
हेही वाचा...नागपुरातून दु:खद बातमी! पोलिस उपनिरीक्षकासह हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. पण, त्यासाठी एकदम जर धिसाडघाईने उघडले आणि साथ प्रचंड वाढली आणि जीवच गेला तर पोटापाण्याचं काय करणार? कारखान्यांमध्ये ही साथ घुसली तर काय होणार? म्हणून एक गोष्ट स्वीकारली पाहिजे की, कोरोनाचं काय व्हायचं ते होईल, किती माणसे मृत्युमुखी पडतील ती पडतील, पण आम्हाला लॉकडाऊन नको. आहे का तयारी? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला होता. .