• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नागपुरातून दु:खद बातमी! पोलिस उपनिरीक्षकासह हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू

नागपुरातून दु:खद बातमी! पोलिस उपनिरीक्षकासह हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू

महापौर संदीप जोशी हे देखील झाले होम क्वारंटाइन

  • Share this:
नागपूर, 6 ऑगस्ट: राज्यात कोरोनाचा कहर अद्याप कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच नागपूर पोलिस दलातील एक दु:खद बातमी समोर आली आहे. पोलिस उपनिरीक्षकासह हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उपनिरीक्षक भगवान शेजुळे आणि धंतोली पोलिस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सिद्धार्थ सहारे यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर नागपुरातील मेडिकल या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. हेही वाचा...रत्नागिरी हादरलं! 42 बालकांचे प्राण वाचवणाऱ्या कोविड योद्धाचा कोरोनामुळे मृत्यू नागपूरात कोरोनामुळं पहिल्यादाच एका पोलिस उपनिरीक्षकासह हेडकोंस्टेबलचा बळी गेला आहे. या घटनेमुळे नागपुर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या दुःखद घटनेनंतर नागपूर पोलिसांनी अधिक खबरदारी घेण्याचे ठरवलं आहे. कर्त्यव्यावर असताना पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक सतर्कता बाळगावी आणि कोणाचे लक्षण दिसल्यास करून कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी केलं आहे. एका दिवसांत 558 जणांना कोरोनाची लागण दुसरीकडे, नागपूरात बुधवारी एका दिवसांत तब्बल 558 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नागपूरात आतापर्यंत 7041 कोरोनाबाधित रुग्ण असून आतापर्यंत 204 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महापौर होम क्वारंटाइन... नागपूर महापालिकेचे महापौर संदीप जोशी हे सात दिवस होम क्वारंटाइन झाले आहेत. कोरोनाबाधित परिवारातील सदस्याच्या संपर्कात आल्यानं महापौर संदीप जोशी यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, संदीप जोशी यांची प्रकृत्ती उत्तम असल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करुन दिली आहे. हेही वाचा...फोटो दिसणाऱ्या या चिमुरडीने मृत्यूवर मिळवला विजय, 4 तास पुरात वाहिली आणि... पुन्हा 10 हजारांवर नवे रुग्ण; मृत्यूंची संख्याही जास्त महाराष्ट्रात बुधवारी पुन्हा एकदा 10 हजारांहून अधिक संख्येने नवे Corona रुग्ण सापडले. याशिवाय 334 जणांचा मृत्यूही नोंदला गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्यातच पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. 1 ऑगस्टपासून राज्यात पुनःश्च हरिओमची घोषणा केली असतानाच आज महाराष्ट्रातून धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 10,309 कोरोनारुग्णांचं निदान झालं. गेले काही दिवस दहा हजारांच्या आसपास नव्या कोरोनारुग्ण सापडत आहेत. त्यात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यातून आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: