• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • धक्कादायक! हत्या केलेल्या गुन्हेगारानं कारागृहाच्या बॅरेकमध्येच लावला गळफास

धक्कादायक! हत्या केलेल्या गुन्हेगारानं कारागृहाच्या बॅरेकमध्येच लावला गळफास

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील गोपीचंदविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल होता

 • Share this:
  नरेंद्र मते (प्रतिनिधी), वर्धा, 6 ऑगस्ट: हत्या प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या एका गुन्हेगारानं कारगृहाच्या बॅरेकमध्येच गळफास लावून आत्महत्या केली आहे. गुरूवारी पहाटे ही घटना घडली. आत्महत्या प्रकरणाचा वर्धा शहर पोलिस तपास करत आहेत. गोपीचंद रामचंद्र डहाके (वय-38) असं आत्महत्या केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. हेही वाचा...नागपुरातून दु:खद बातमी! पोलिस उपनिरीक्षकासह हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू मृत कैदी गोपीचंद डहाके हा यवतमाळचा राहिवारी होता. पॅरोलवर सोडल्यानंतर तो फरार झाला होता. नंतर यवतमाळ पोलिसांनी त्याला मूळगावी पुन्हा अटक केली होती. नंतर त्याची वर्धा कारगृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र, आता त्यानं गुरूवारी पहाटे बॅरेकमध्ये दुपट्टा खिडकीला बांधून गळफास घेतला. या घटनमुळे जेल व्यवस्थापन हादरले आहे. घडलेल्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून गोपीचंद चिंतेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथे पाठवला आहे. मिळालेली माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील गोपीचंदविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात त्याला शिक्षा ठोठावण्यात आली होती. अमरावती कारागृहात काही महिने त्याला ठेवण्यात आलं होतं नंतर वर्धा येथील कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी गोपीचंदला पॅरोल रजेवर सोडण्यात आलं होतं. मात्र, पॅरोलचा कालावधी समाप्त झाल्यावर देखील तो कारागृहात परतला नव्हता. त्यामुळे अमरावती, यवतमाळ, वर्धा पोलिस त्याच्या मागावर होते. हेही वाचा...रत्नागिरी हादरलं! 42 बालकांचे प्राण वाचवणाऱ्या कोविड योद्धाचा कोरोनामुळे मृत्यू यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असल्याने स्थानिक पोलिसांनी त्याच्या गावावर लक्ष केंद्रीत केलं होतं. गोपीचंद मुळ गावी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथंच त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. चौकशीनंतर त्याची वर्धा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. या आत्महत्येप्रकरणी वर्धा शहर पोलिस तपास करत आहेत.
  Published by:Sandip Parolekar
  First published: