• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • मौलानाकडून 6 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार; वर्ध्यातील खळबळजनक घटना

मौलानाकडून 6 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार; वर्ध्यातील खळबळजनक घटना

Crime in Wardha: वर्ध्यातील रामनगर परिसरात एका मौलानाने 6 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार (unnatural sex with minor boy) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

 • Share this:
  वर्धा, 20 ऑक्टोबर: वर्ध्यातील (Wardha) रामनगर (Ramnagar) परिसरात एका मौलानाने 6 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार (unnatural sex with minor boy) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपीनं मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास एकट्या मुलाला पाहून त्याच्यावर अमानुष अत्याचार केला आहे. यानंतर पीडित मुलाने हा संतापजनक प्रकार थेट आपल्या आई वडिलांना सांगितला आहे. यानंतर पीडित मुलाच्या आई वडिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पीडित मुलाच्या आई-वडिलांनी फिर्याद दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम आरोपी मौलानाला अटक (Accused maulana arrested) केली आहे. समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान असं अटक करण्यात आलेल्या 25 वर्षीय मौलानाचं नाव आहे. मौलाना समीउल्ला खान याचं शिक्षण सुरत येथील जामिया इस्लामिया अरबी मदरसातून पूर्ण झालं आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून वर्ध्यात वास्तव्यास आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर, मुस्लीम समुदायातून देखील तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हेही वाचा-'लाइफ बना दुंगा', चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार आरोपी मौलाना समीउल्ला याने मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास सहा वर्षीय मुलाला एकटं पाहिलं होतं. यावेळी त्यानं मुलाला बोलावून एका खोलीत घेऊन केला. आसपास कोणी नसल्याचं पाहून नराधम मौलाने चिमुकल्या निरागस मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केलं आहे. यानंतर आरोपीनं मुलाला दमदाटी करून हाकलून दिलं. पण मुलानं घरी येऊन संबंधित प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आहे. यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. हेही वाचा-पुणे: विवाहित बहिणीसोबत भावाचं विकृत कृत्य; नवरा घरी नसताना भेटायला आला अन्... या घटनेची माहिती मिळताच, पीडित मुलाच्या आईनं संबंधित प्रकार आर्वी नाका चौकात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना सांगितला. संबंधित पोलिसांनी त्यांना तत्काळ रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. यानंतर पीडित बालकाच्या आईने रामनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत रामनगर पोलिसांनी आरोपी मौलाना समीउल्ला खान याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: