मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अस्मानी संकटांना नडला पण बँकेच्या नोटीशीपुढे हरला; शेतकऱ्यानं बँकेसमोरच संपवलं जीवन

अस्मानी संकटांना नडला पण बँकेच्या नोटीशीपुढे हरला; शेतकऱ्यानं बँकेसमोरच संपवलं जीवन

Suicide in Nanded: अतिवृष्टी आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या नांदेडमधील एका शेतकऱ्यानं बँकेसमोरच आत्महत्या (farmer commits suicide in front of bank) केली आहे.

Suicide in Nanded: अतिवृष्टी आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या नांदेडमधील एका शेतकऱ्यानं बँकेसमोरच आत्महत्या (farmer commits suicide in front of bank) केली आहे.

Suicide in Nanded: अतिवृष्टी आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या नांदेडमधील एका शेतकऱ्यानं बँकेसमोरच आत्महत्या (farmer commits suicide in front of bank) केली आहे.

नांदेड, 14 नोव्हेंबर: यंदा मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने विविध नद्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली होती. तर अनेक गावं पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसात हजारो शेतकऱ्यांची शेती पिकांसह खरडून वाहून गेली आहे. अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचा हाता तोंडाला आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

अशात नांदेडमध्ये (Nanded) अतिवृष्टी आणि नापिकीमुळे हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याला बँकेनं कर्ज वसुलीबाबत नोटीस पाठवली आहे. संबंधित नोटीस बजावल्यानंतर, आर्थिक संकटापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांने बँकेसमोरच विष प्राशन (drink poison) करून आपल्या आयुष्याचा शेवट (farmer commits suicide in front of bank) केला आहे. बँकेच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-सांगोला: अपघात घडवून 45लाखांचं सोन्याचं बिस्किट पळवलं; मित्रच निघाला मास्टरमाइंड

केशव रामदास पवार असं आत्महत्या करणाऱ्या 55 वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून ते माहूर तालुक्यातील नयेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर बुलडाणा अर्बन बँकेचं दोन लाखांचं कर्ज होतं. दोनेक दिवसांपूर्वी बँकेनं त्यांना कर्जफेडीबाबतची नोटीस पाठवली होती. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास पवार हे कर्जाबाबत चौकशी करण्यासाठी बँकेत गेले होते. पण बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी बँकेच्या आवारातच विष प्राशन करत जीवनाचा शेवट आहे.

हेही वाचा-शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी रचला खुनाचा कट; पण डाव उलटला अन् कुटुंबासह झाली गजाआड

मृत पवार यांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं, हाता-तोडांला आलेला घास अस्मानी संकाटानं हिरावला होता. त्यामुळे पवार मागील काही काळापासून आर्थिक संकटांचा सामना करत होते. तसेच बँकेचं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून त्यांना नैराश्य आलं होतं. अशात बँकेनं कर्जवसुलीसाठी नोटीस बजावल्यानं पवार यांनी आपलं जीवन संपवलं आहे. पवार यांनी अशा पद्धतीनं हृदयद्रावक शेवट केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Nanded, Suicide