• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी रचला खुनाचा कट; पण डाव उलटला अन् कुटुंबासह झाली गजाआड

शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी रचला खुनाचा कट; पण डाव उलटला अन् कुटुंबासह झाली गजाआड

Crime News: शेजाऱ्यांसोबत सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून एका महिलेनं आपल्या कुटुंबीयांना हाताशी धरून आपल्या बहिणीच्या सासऱ्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

 • Share this:
  देहरादून, 13 नोव्हेंबर: शेजाऱ्यांसोबत सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून एका महिलेनं आपल्या कुटुंबीयांना हाताशी धरून आपल्या बहिणीच्या सासऱ्याची हत्या (Sister's father in law murder) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिलेनं आपल्या शेजाऱ्यांना हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी हा कट रचला होता. पण पोलिसांनी हत्येच्या घटनेची उकल केली असून मुख्य आरोपी महिलेसह सहा जणांना बेड्या ठोकल्या (6 Arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मुख्य आरोपी लविंद्र, तिची आई गुरदीप, भाऊ सूरज, बहीण राजविंदर, जावई कुलवंत आणि शूटर जसवंत सिंह अशी अटक केलेल्या सहा आरोपींची नावं आहेत. आरोपींनी 9 नोव्हेंबर रोजी रात्री नानकमत्ताच्या ध्यानपूर येथे आपल्या सुनेच्या घरी आलेल्या जगीर सिंह यांची गोळी घालून हत्या केली आहे. मृत जगीर सिंह हे मुख्य आरोपीच्या बहिणीचे सासरे होते. घटनेच्या दिवशी ते आपल्या सुनेच्या घरी आले होते. रात्री घराच्या अंगणात झोपले असताना, त्यांची निर्घृण हत्या केली आहे. हेही वाचा- अमेरिकेतील प्रियकराने पुण्यातील तरुणीच्या संसारात कालवलं विष; लग्नापूर्वीचा SEX VIDEO पतीला पाठवला अन्... हत्या केल्यानंतर मुख्य आरोपी लविंद्र आणि लहान बहीण रजविंदर यांनी गावातील सरपंच समर सिंह, बलविंद्र, लखविंदर, द्वारिका, सुंदर, जिंतेंद्र आणि धर्मेंद्र यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पण घटनेच्या दिवशी संबंधित सर्व आरोपी आपल्या घरात असल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं. त्यामुळे फिर्यादींनीच हत्या केली असावी, असा संशय बळावला. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादींची उलट तपासणी केली असता, खुनाचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक केली आहे. हेही वाचा- संतापजनक! शाळेत शिक्षकाकडून सुरू होतं लैंगिक शोषण; बारावीच्या विद्यार्थिनीनं उचललं भयावह पाऊल आरोपींनी हत्येसाठी जसवंत सिंह याला 50 हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्यासाठी 15 हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले होते. हत्या झाल्यानंतर उर्वरित रक्कम द्यायचं ठरलं होतं. पण पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत हत्येचं गूढ उलगडलं आहे. पोलिसांनी आरोपी जसवंत सिंह त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेली बंदूक आणि 15 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: