मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जागेच्या तुकड्यासाठी चुलत्याने केली मारहाण, पुतण्याने घेतले पेटवून, जालन्यातील घटना

जागेच्या तुकड्यासाठी चुलत्याने केली मारहाण, पुतण्याने घेतले पेटवून, जालन्यातील घटना

अंगावर डिझेल ओतून घेऊन दीपकने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनीही त्याला विझवण्याचे प्रयत्न केला नाही.

अंगावर डिझेल ओतून घेऊन दीपकने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनीही त्याला विझवण्याचे प्रयत्न केला नाही.

अंगावर डिझेल ओतून घेऊन दीपकने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनीही त्याला विझवण्याचे प्रयत्न केला नाही.

जालना, 27 नोव्हेंबर : जागेच्या तुकड्यासाठी ( land dispute) काही महाभाग रक्ताची नाती विसरून ऐकमेकांच्या जीवावर उठून येतात. जालन्यात (jalana) सुद्धा असाचा प्रकार घडला आहे. जागेच्या वादातून चुलत्याकडून मारहाण झाल्यानंतर पुतण्याने स्वतःला जाळून घेतल्याची घटना घडली आहे. जाळून घातलेल्या पुतण्याचा (nephew) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागेच्या वादातून मारहाण केल्याने एका तरुणाने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली आहे. जालन्यातील परतुर मधील वाई येथे ही घटना घडली आहे. दीपक घाडगे असं जाळून घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचा स्वतःला जाळून घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

परतूर तालुक्यातील वाई गावात अंगणवाडी शेड असलेल्या जागेच्या हिस्स्यावरून 35 वर्षीय दीपक घाडगे आणि त्याचा चुलता मुक्तीराम  घाडगे यांच्या वाद सुरू होता. या वादातून शुक्रवारी दुपारी ४.०० वाजता दीपकला त्याचा चुलता मुक्तिराम आणि त्यांच्या साथीदारांनी दीपकला काठ्या-लाठ्यांनी बेदम मारहाण केली होती.

परळी वैद्यनाथ मंदिर RDX ने उडवून देणाऱ्यांची निघाली हवा,पोलिसांनी 2 जणांना पकडले

त्यानंतर रागाच्या भरात सर्व लोकांसमोर अंगावर डिझेल ओतून घेऊन दीपकने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनीही त्याला विझवण्याचे प्रयत्न केला नाही. यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या दीपक यास सुरुवातीला जालना इथं रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविले होते. दरम्यान आज उपचार सुरू असतांना दीपकचा मृत्यू झाला आहे.

Shocking! आजोबांसमोर आपले सर्व कपडे काढले; वृद्धाश्रमात घुसून महिलेचे अश्लील चाळ

याप्रकरणी मयत दीपक याची पत्नी सपना घाडगे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांनी आरोपी मुक्तिराम घाडगे, अभिजित घाडगे, मीना घाडगे, अर्जुन येवले, परमेश्वर येवले आणि भीमा येवले या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या मयताच्या चुलत्याला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: जालना, मारहाण