मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

परळी वैद्यनाथ मंदिर RDX ने उडवून देणाऱ्यांची निघाली हवा, पोलिसांनी नांदेडमधून दोघांना पकडले

परळी वैद्यनाथ मंदिर RDX ने उडवून देणाऱ्यांची निघाली हवा, पोलिसांनी नांदेडमधून दोघांना पकडले

पोलिसांनी 24 तासात तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना नांदेडहून ताब्यात घेतले आहे. या दोघांचीही सध्या अधिक चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी 24 तासात तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना नांदेडहून ताब्यात घेतले आहे. या दोघांचीही सध्या अधिक चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी 24 तासात तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना नांदेडहून ताब्यात घेतले आहे. या दोघांचीही सध्या अधिक चौकशी सुरू आहे.

परळी, 26 नोव्हेंबर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं बीड (beed) जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर (Parli Vaidyanath Jyotirlinga temple) आरडीएक्स (rdx) लावून उडवून देण्याची धमकी एका गुंडाने दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी 24 तासात छडा लावून दोन जणांना नांदेडमधून अटक केली आहे.

परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची कथित माफियाच्या धमकी पत्र प्रकरणानंतर वैद्यनाथ मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.या प्रकरणी परळी शहर पोलिसांनी दोन आरोपींना नांदेडहून ताब्यात घेतले आहे. पन्नास लाख रुपये द्या; अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू! या आशयाचे पत्र वैद्यनाथ मंदिर संस्थानाला प्राप्त झाल होतं. या पत्रानंतर एकच खळबळ माजली होती.

Oppo ची Reno 7 Series लाँच; पाहा काय आहेत फीचर्स

पोलिसांनी 24 तासात तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना नांदेडहून ताब्यात घेतले आहे. या दोघांचीही सध्या अधिक चौकशी सुरू आहे. तर बीड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली असून श्वान पथकही बोलवण्यात आले आहे. दरम्यान मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत. त्यांना शुक्रवारी एक पत्र मिळाले होते. ज्यामध्ये वैद्यनाथ मंदिर संस्थानकडे खूप पैसे आले आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आर.डी.एक्सने मंदिर उडवून देवू असा मजकूर लिहलेला आहे. त्यावर मोबाईल नंबर व नाव आहे. रतनसिंग रामसिंग दख्खणे अशी धमकी देणाऱ्या गुंडाचे नाव आहे.

भय्यू महाराजांना अश्लील व्हिडीओजद्वारे ब्लॅकमेलिंग, पलकच्या कुकृत्यांची पोलखोल

'मी फार मोठा नामी गुंड आहे व ड्रग माफिया असून गावठी पिस्तूल धारक आहे.  मला माझ्या तातडीची गरज भागवण्यासाठी आपल्या मंदिर संस्थांकडून 50 लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच आपण मला वरील रक्कम माझ्या खालील पत्त्यावर ताबडतोब पोस्ट करावी, नसता  आपले मंदिर संस्थान माझ्याकडील आरडीएक्स उडवून लावेल, अशी धमकीच या गुंडाने दिली. या पत्रामुळे खळबळ उडाली होती अखेरीस

मंदिर समिती आणि विश्वस्त यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून मंदिराला अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली.

First published: