उल्हासनगर, 07 ऑगस्ट : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. मौजमजा करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने दुचाकी चोरीचा (bike stolen) सपाटा लावला होता. हा अल्पवयीन चोर (Thief) दुचाकी चोरून दिवसभर शहरात फिरायचा आणि पेट्रोल संपलं की त्याच ठिकाणी लावून पोबारा करायचा. अखेर त्याची ही युक्ती त्याच्यावर उलटली.
या दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला उल्हासनगर पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार सायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. याच अनुषंगाने उल्हासनगर पोलिसांनी गुप्त बातमीदाराने एका मुलाकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली.
अरे बापरे! कुणाच्या हातात कुणाच्या गळ्यात, सापांना घेऊन रस्त्यात फिरतायेत लोक
त्यानुसार, म्हारळ गावात नाना किराणा स्टोरजवळ उभी असलेली एक दुचाकी चोरीची असल्याचे माहिती देणाऱ्याने सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला आणि ही दुचाकी घेण्यासाठी आलेल्या एकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या या अल्पवयीन चोराकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याने तीन एक्टिव्हा आणि एक टीव्हीएस ज्युपिटर गाडी चोरी केल्याचे कबुल केलं.
यात त्याने उल्हासनगर पोलीस ठाण्याचा तीन गुन्हे केले असून एक गुन्हा दुसऱ्या पोलीस ठाण्यातील असल्याचे पोलिसांनी माहिती दिली. या माहिती नंतर पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.