Home /News /news /

Tokyo: माथेफिरूने रेल्वेत केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणं जखमी; विचित्र कारण आलं समोर

Tokyo: माथेफिरूने रेल्वेत केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणं जखमी; विचित्र कारण आलं समोर

आनंदी दिसणाऱ्या महिलांना ठार करण्याच्या उद्देशानं हा चाकूहल्ला केल्याचं या हल्लेखोरानं पोलिसांना सांगितलं.

    टोकियो, 7 ऑगस्ट : ऑलिम्पिक स्पर्धांमुळे (Olympic) चर्चेत असलेल्या टोकियोमध्ये (Tokyo) घडलेल्या एका थरारक घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका हल्लेखोरानं रात्री उशिरा रेल्वेतील 10 प्रवाशांवर चाकूने वार (Knife Attack) करत त्यांना जखमी केलं आहे. यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या हल्लेखोराला अटक केली आहे. या हल्ल्यामागचं कारण अत्यंत विचित्र असून, आनंदी दिसणाऱ्या महिलांना ठार करण्याच्या उद्देशानं हा चाकूहल्ला केल्याचं या हल्लेखोरानं पोलिसांना सांगितलं. त्यामुळं हा हल्लेखोर मानसिक रुग्ण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, या विचित्र कारणाबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. टीव्ही9 हिंदी डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. दरम्यान, उद्या समाप्त होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकशी (Tokyo Olympic) या घटनेचा काहीही संबंध नाही. ही घटना मुख्य राष्ट्रीय स्टेडियमपासून 15 किलोमीटर अंतरावर घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सार्वजनिक प्रसारण व्यवस्था एनएचकेनं (NHK) दिलेल्या माहितीनुसार, सिजोगाकुएन स्टेशनजवळ रात्री उशिरा ही घटना घडली. रेल्वेतून (Railway) प्रवास करणाऱ्या एका 36 वर्षीय हल्लेखोरानं अचानक लोकांवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. त्यानं पहिल्यांदा एका 20 वर्षीय महिलेवर चाकूनं वार केले. या मुलीची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यानंतर या हल्लेखोरानं समोर दिसेल त्या व्यक्तीवर चाकूनं वार करायला सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेच्या डब्यात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली तेव्हा मदतीसाठी हाका मारणारे, रक्ताने माखलेले लोक रेल्वेच्या डब्यातून बाहेर आले. अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस (Police), पॅरामेडिक्स कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारीही आले. त्यांनी नऊ जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं तर एका प्रवाशाला फार लागले नव्हते. सर्व जखमी सुखरूप असल्याचं अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे ही वाचा-नीरज चोप्रा YouTube वरून शिकला होता भालाफेक, आज गोल्ड जिंकून घडवला इतिहास! दरम्यान, या गोंधळाचा फायदा घेत हातातला चाकू तिथेच टाकून हल्लेखोर रेल्वेच्या डब्यातून उतरून पळत सुटला आणि एका स्टोअरमध्ये (Store) घुसला. तोपर्यंत त्याच्या माहितीसह या घटनेची बातमी टीव्हीवर प्रसारित झाली होती. त्यानं स्वत:ला टीव्हीवर संशयित म्हणून पाहिले आणि स्टोअरच्या व्यवस्थापकाला त्यानं सांगितलं की तो धावून धावून थकला आहे. त्या स्टोअर मॅनेजरने ताबडतोब पोलिसांना ही माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या माथेफिरूला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी खाद्य तेल (Cooking Oil) आणि लायटर जप्त केला. हल्ला केल्यावर रेल्वेच्या डब्याला आग (Fire) लावण्याचा त्याचा विचार होता, असं पोलिसांनी सांगितलं.
    First published:

    Tags: Japan, Tokyo

    पुढील बातम्या