रत्नागिरी, 5 डिसेंबर : राज्यातील सत्तांतरानंतर राजकीय समीकरण बदललं. शिवसेनेचे 56 पैकी 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले, तर उरलेले 16 आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. या 16 आमदारांपैकी दोन आमदार अडचणीत आले आहेत. कोकणातील ठाकरेंचं आमदार वैभव नाईक आणि राजन साळवी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
सोमवारी कुडाळचे आमदार वैभव नाईक यांची एसीबीने तब्बल साडेचार तास चौकशी केली. आम्ही शिंदे गटात जात नाही, म्हणून हा दबाव तंत्राचा भाग आहे. माझ्या चौकशीच्या मागे नारायण राणे आणि कुटुंबियांचा हात आहे, असा आरोप चौकशीनंतर वैभव नाईक यांनी केला आहे.
राजकीय पदाचा गैरवापर करून अवैध संपत्ती गोळा केल्याची नाईक यांच्याविरोधात एसीबीकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार नाईक यांच्याकडे 2002 ते 2022 दरम्यानच्या उत्पन्नाचा तपशील एसीबीने मागितला आहे. वैभव नाईक यांच्या या चौकशीवरून आता राजकारण रंगलं आहे.
महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात महाविकासआघाडीचा विराट मोर्चा, उद्धव ठाकरे आक्रमक
'9 डिसेंबरला कागदपत्रं घेऊन पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेक. माझी पत्नी आणि भाऊ यांचेही जबाब नोंदवले गेले आहेत. आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहोतक. 1996 सालापासूनची सगळी कागदपत्र एसीबीला दिली आहेत. 9 तारखेला पूर्ण कागदपत्र देऊ शकत नाही. 20 वर्षांचा कालावधी असल्यामुळे आम्ही मुदतवाढ मागायच्या तयारीमध्ये आहोत,' अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
वैभव नाईक यांच्याप्रमाणेच ठाकरेंचं राजापूरचे आमदार राजन साळवी यांना सोमवारी अलिबागच्या एसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं, पण राजन साळवींनी चौकशीकडे पाठ फिरवली.
राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा निघणार का? अजितदादांनी सांगितली महाविकासआघाडीची रणनीती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena, Uddhav Thackeray