मुंबई, 11 ऑक्टोबर : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे आधी आमदार फुटले नंतर पक्षाचे चिन्हही गेलं. शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. आज काही शिवसैनिक हे मशाल घेऊन मातोश्रीवर पोहोचले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही गद्धारांना जाळणारी आहे. या मशालीचे महत्व, तेज त्याचा धोका सगळं लक्षात घ्या’ असं म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला, अंधेरी येथील काही शिवसैनिक मशाल घेऊन उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचले. हे शिवसैनिक शिवाजी पार्कवर मशाल घेऊन आले होते. त्यानंतर शिवसैनिक मशाल घेऊन मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
अंधेरी येथील शिवसैनिक मशाल घेऊन पोहोचले मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंनी मानले आभार pic.twitter.com/SCuChWXRWE
— News18Lokmat (@News18lokmat) October 11, 2022
यावेळी, ‘ही मशाल अन्याय आणि गद्धारी जाळणारी आहे. या मशालीचे महत्व, तेज त्याचा धोका सगळं लक्षात घ्या’ असं म्हणत सर्व शिवसैनिकांचं कौतुक केलं. (आता काय उजेड पाडणार, नारायण राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली) दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे अमरावती दौऱ्यावर आहे. अंबादास दानवे यांनी मेळघाटातील धारणी येथील कुपोषनाचा आढावा घेतला, व त्यांनी काही कुपोषित बालकांच्या घरी जाऊन परिस्थिती जाणून घेतली. ( सत्तेत तुम्हालाच…,मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं मोठं विधान, उद्धव दादूलाही डिवचलं! ) यावेळी त्यांनी शिवसेनेला मिळालेल्या चिन्हावर प्रतिक्रिया दिली. ‘मशाल चिन्ह सर्वांच्या घराघरात पोहोचले आहे व जनतेने मशाल चिन्हाच मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं आहे, मशालीच्या माध्यमातून याच्या ज्वाला आणि अग्नी निघेल जे कोणी गद्दार आहे ते यात भस्मसात होईल’ अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली.