मुंबई, 11 ऑक्टोंबर : मागच्या काही दिवसापासून ठाकरे गट आणि शिंदे गटात चिन्हावरून वाद सुरू आहे. यावरून दोन्ही गटाकडून जोरदार विरोध होत आहे. दरम्यान भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी मशाल या मिळालेल्या चिन्हावरूनही टीका केली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला मजबुती देतील तेच खरे वारसदार असल्याचे नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी धनुष्यबाणावरूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
राणे म्हणाले कि, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. उद्धवच्या शिवसेनेत बाळासाहेबांना दुय्यम स्थान आहे यामुळे शिंदे यांची शिवसेनाच मोठी आणि मजबूत होणार आहे. उद्धव ठाकरे सत्तेत असताना क्रांती घडवली नाही आणि आता हे काय मशाल घेऊन क्रांती घडवणार आहेत. लोकांची घरे उद्धवस्त करण्यासाठी मशाली लावू नका अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.
हे ही वाचा : सत्तेत तुम्हालाच...,मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं मोठं विधान, उद्धव दादूलाही डिवचलं!
मशाल केव्हा वापरतात हे सगळ्यांना माहिती आहे. धनुष्य बाणाने उजेड पाडला नाही तर आता मशाल ने काय करणारं असाही टोला राणे यांनी लगावला. तसेच ही आघाडी नाही तर बिघाडी आहे. राज्यात काँग्रेस कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे तर एनसीपी स्वतच: शोधात असल्याचे राणे म्हणाले.
दरम्यन पालघर साधू हत्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. लवकरात लवकर साधूंना मारहाण झाली यामध्ये लवकरच न्याय मिळेल. तर राज्यात महिलांचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत तर साधूंच्या हत्या कशा रोखता येतील याकडेही आमचे लक्ष लागून असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा : शिंदे गट 'या' चिन्हाबद्दल आहे प्रचंड आशावादी, शिवसेनेला देईन टक्कर!
आमदार वैभव नाईकांचा घाणाघात
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी कुख्यात गुंड छोटा शकीलला सुपारी देण्यात आली होती, असा आरोप केला होता. कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी त्याला प्रत्युत्तर देत राणे याआधी सुपारी घ्यायचे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, असा पलटवार केला. काही खु्नांच्या केस मध्ये राणेंचा हात होता. आणि त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप ही झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलायला तुम्हाला वीस वर्षे का लागली असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde, Narayan rane, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)