जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तुरुंगातील शंभर दिवसांवर पुस्तक तयार, राऊत म्हणतात तुरुंगातील एक दिवस....

तुरुंगातील शंभर दिवसांवर पुस्तक तयार, राऊत म्हणतात तुरुंगातील एक दिवस....

तुरुंगातील शंभर दिवसांवर पुस्तक तयार, राऊत म्हणतात तुरुंगातील एक दिवस....

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना बुधवारी तब्बल 100 दिवसांनी जामीन मिळाला. जेलबाहेर येताच शिवसैनिकांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. दरम्यान जेलमधून बाहेर येताच आज संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.  राज्यात शिवसेना एकच आहे, शिवसेनेसाठी एकदाच काय दहावेळा माझी तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं? उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.  राज्य फडणवीसच चालवत असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. राज्यात शिवसेना एकच आहे. गेल्या 40 वर्षांत मला पक्षाने भरपूर दिलं. मी कधीही पक्षाच्या पाठित खंजित खूपसणार नाही. शिवसेनेसाठी एकदाच नाही तर दहावेळा तुरुंगात जाण्याची तयारी आहे. मला पक्षात भरपूर प्रेम मिळालं. मी एकटा नसून कार्यकर्ते माझ्यासोबत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. कोठडीतील दिवसांवर पुस्तक तयार  दरम्यान या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी आपला तुरुंगातील अनुभवही सांगितला आहे, तुरुंगातील एक दिवस शंभर दिवसासारखा होता. कोठडीतील दिवसांवर पुस्तक तयार आहे असं राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने मला भरपूर प्रेम दिलं. आदित्य मशाल पुढे घेऊन जातील असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. संजय राऊत यांचं भव्य स्वागत  संजय राऊत यांना बुधवारी तब्बल 100 दिवसांनी जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत जेलबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर देखील कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. त्यानंतर आज  संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत. पत्रकार परिषद घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात