मुंबई, 9 ऑक्टोबर : शिवसेनेवर आज खूप मोठं संकट ओढावलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर आज खूप मोठं आव्हान उभं राहिलं आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने काल शिवसेनेच्या पक्षचिन्हबाबत मोठा निर्णय जाहीर केलाय. खरंतर संबंधित निर्णय हा तात्पुरता स्वरुपाचा आहे. हा निर्णय अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपुरता मर्यादीत आहे. या निवडणुकीत ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच निवडणूक आयोगाला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज दुपारी एक वाजेपर्यंत चिन्ह सूचवायचे होते. ते शिवसेनेने सूचवले आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान उद्धव ठाकरे यांच्यापुढे महत्त्वाचं आव्हान आहे. आता जे घडेल त्याला सामोरं जाणं आणि संयमाने परिस्थिती हाताळणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे ते सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी स्वत: फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सविस्तर आपली भूमिका मांडली. “आपण सहन केलं, पण आता अती होत आहे. स्वत: शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत, हे अती होत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आम्हाला मिळू नये म्हणून खोकेसूरांनी प्रयत्न केले”, अशा रोखठोक पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी मी कोरोना काळात वेळोवेळी याच माध्यमातून येत होतो आणि काही सूचना देत होतो. त्या सूचना तुम्ही पाळल्या आणि आपण कोरोनावर मात केली. आपला संवाद त्यावेळेला चालू होता त्यावेळी अनेकांनी सांगितलं आणि यावेळी देखील अनेकजण भेटतात आणि सांगतात की, उद्धवजी तुम्ही आमच्याच कुटुंबाचे एक भाग झालेले आहात. म्हणून आज मी माझ्या कुटुंबियांशी पुन्हा एकदा एक वेगळ्या विषयाशी मन मोकळं करायला आणि संवाद साधायला या माध्यामातून भेटायला आलेलो आहे. यापूर्वी मी आपल्यासमोर आलो होतो तोही काळ मला आठवतोय. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्रीपदी नको, ते पद मलाच पाहिजे, असं म्हणून काही जणांनी आपल्याशी गद्दारी केली. त्यावेळेला मी आपल्यासमोर आलो होतो आणि वर्षा या शासकीय निवासस्थानाचा त्याग केला होता. त्यानंतर मी इथेच बसून मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला होता. तोही संवाद मी याच माध्यमातून साधला होता. आता तर तीन महिने होऊन गेले. मुख्यमंत्रीपद ज्यांना पाहिजे होतं त्यांनी ते घेतलं. ज्यांना सर्वकाही देवून सुद्धा एक मनामध्ये धुसफूस नाराजी होती, तेही गेले. ठीक आहे. आपण काही बोललो नाही अशातला भाग नाही. पण आपण सहन केलं. आता अती व्हायला लागलं आहे. कारण शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको इथपर्यंत मनसुबे असू शकतात. पण हे स्वत: शिवसेनाप्रमुख व्हायला निघाले आहेत. हे अति होतंय. त्यासाठी आवाका काय हेही विचार करायचं आहे. पुढचं काही बोलायचं आधी मी सगळ्यांना धन्यवाद देतोय. आता अती व्हायला लागलं आहे. कारण शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको इथपर्यंत मनसुबे असू शकतात. पण हे स्वत: शिवसेनाप्रमुख व्हायला निघाले आहेत. हे अति होतंय. त्यासाठी आवाका काय हेही विचार करायचं आहे. पुढचं काही बोलायचं आधी मी सगळ्यांना धन्यवाद देतोय. दसरा मेळाव्यासाठी सर्वसान्य आले होते. दिव्यांग तरुण आळे होते. शिवसेना एक शिवसेना मानत आले होते. त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही मानत आहात म्हणून ही परंपरा आहे. काही काळासाठी आपलं चिन्ह आणि नाव गोठवलं आहे. हरकत नाही. खरंतर हा अन्याय आहे. कारण पहिलं सर्वोच्च न्यायालयात एक प्रकरण आपण दाखल केलं आहे. 16 जणांच्या अपात्रतेचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मला निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षितच नव्हता. खरं म्हणजे मला निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षितच नव्हता. अनेक घटनातज्ज्ञांनी सांगितलं आहे, घटनेनुसार निकाल लागला तर काय लागणार आहे ते त्यांनीच सांगितलं आहे. उद्या त्यांचे बारा वाजल्यानंतर हा जो गोंधळ घातला गेला आहे तो निस्तारणार कोण? मुळामध्ये तेच जर अपात्र ठरले तर आजचं जे गोठवलंपण आहे त्याची जबाबदारी घ्यायची कोणी? माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यादेवता नक्की आपल्याला न्याय देईल ही मला खात्री आहे. काल निवडणूक आयोगाने आपल्याला आदेश दिल्यानंतर आपण तात्काळ निवडणूक आयोगाला तीन चिन्हे दिली आहेत. यामध्ये एक त्रिशूळ आहे. दुसरं उगवता सूर्य आणि तिसरा धगधगती मशाल. तीन नावं सुद्धा आपण तात्पुरत्या वेळासाठी निवडणूक आयोगाला दिली आहेत. त्यातील पहिलं नाव हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, तिसरं उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. निवडणूक आयोग म्हटल्यानंतर नि:पक्षपातीपणा आठवतं. कारण तुम्ही लोकशाहीचे रक्षणकर्ते आहात. आपण म्हटल्याप्रमाणे नावं आणि चिन्हं सादर केली आहेत. अंधेरीची पोटनिवडणूक आहे. आम्हाला लवकरात लवकर यातील एक चिन्ह आणि एक नाव द्या. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो कारण शिवसेनेने काय चिन्हे आणि नाले दिली आहेत ते जनतेला सांगितलं आहे. पण समोरच्यांनी काय दिलंय ते सांगितलेलं नाही. याचाच अर्थ त्यांनी अजूनही काही सादर केलेलं नाही. मी डरनारा नाही. जनता काय फैसला करेल तो मला मान्य आहे. कारण तुमच्यासाठीच सर्व शिवसैनिक राबत असतात. स्वत:च्या जीवाचं रान करत असतात. तुम्ही सर्वोच्च आहात. लोकशाहीत जनता जनार्दन, सर्वात श्रेष्ठ आहे. त्या जनतेच्या दरबारात जायचं आहे. त्यामुळे आम्हाला चिन्ह आणि नाव लवकरात लवकर द्या, अशी मी आयोगाला विनंती करतो. आता शेवटचो एकच सांगेन, आज योगायोगाने कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी, लक्ष्मी येते म्हणतात हा भाग वेगळा, पण कोजागिरीचा अर्थ एकच आहे, दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे तुम्ही जागी राहा. अजिबात झोपू नका. आपल्याला शांत डोक्याने आणि आत्मविश्वासाने ही मोठी लढाई जिंकायची आहे. कारण ही लढाई जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कोणी नसेल. म्हणूनच हात जोडून सर्वांना विनंती करतोय, आपलं प्रेम, विश्वास, आशीर्वाद असाच कायम ठेवा. मी कुठेही डगमगलेलो नाही. कारण माझ्या आजोबा आणि वडिलांनी शिकवलेलं आहे. तुझ्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगामध्ये कुठेही जा तुला कोणी अडवू शकणार नाही. मी जगाच्या पाठीवर जातच नाहीय. मी माझ्या घरामध्ये आहे आणि माझ्या महाराष्ट्रातच आहे. आत्मविश्वास ठासून भरलेला आहे, सोबत तुमच्यासारखी आत्मविश्वास ठासून भरलेली शिवसैनिक आहेत. अनेक जणांचा फोन येतोय. बघा, आता काय होणार? तुम्हाला वाटलं होतं धनुष्यबाण तुम्हाला मिळणार. नाही मिळालं. गोठवून टाकलं आहे. आता तुम्ही बुद्धी गोठलेली नसेल तर माझं आजही तुम्हाला आव्हान आहे बाळासाहेबांचं नाव न घेता जनतेसमोर या. स्वत:चा पक्ष काढा. बाळासाहेबांसमोर या. तुम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हवी, पण बाळासाहेबांचा मुलगा नकोय. तुम्हाला ठाकरे वगळून जी शिवसेना राहणार आहे ती गोशाळेत बांधायची आहे. पण शिवसेना अशी नाही. शिवसेना वाघ आहे. संकटाला घाबरणार नाही. संकटाच्या छातडावर वार करुन चालून जाणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आम्हाला मिळू नये म्हणून खोकेसूरांनी प्रयत्न केले उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत आहे एक दसरा मेळावा साधा, दुसरा पंचतारांकित 40 डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामचंद्राचं धनुष्यबाण गोठवलं उलट्या काळजाच्या माणसांचा कंपू फिरतोय यांनी कट्यार आपल्या आईच्याच काळजात घुसवली, त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील, त्याच्यापेक्षा जास्त आनंद महाशक्तीला होत असेल शिवसेना आणि तुमच्या नावाचा संबंध काय? नाव आजोबांनी दिलं, वडिलांनी रुजवलं, मी पुढे घेऊन जात आहे, तुम्ही त्याचाच घात करत आहात शिवसेना आणि तुमच्या नावाचा संबंध काय? नाव आजोबांनी दिलं, वडिलांनी रुजवलं, मी पुढे घेऊन जात आहे, तुम्ही त्याचाच घात करत आहात. संकटातही संधी दडलेल्या असतात, ही संधी मी शोधतोय, त्या संधीचं सोनं करणार यांचा उपयोग ज्या क्षणी संपेल, चिन्ह गोठवलं आता यांचा उपयोग काय राहिला आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी केलं नाही, ते तुम्ही आता करताय काँग्रेसने कधी शिवसेनेवर बंदी घालण्याचा विचार केला नाही, तुमचा हेतू शिवसेना संपवायचा आहे. काँग्रेसने केलं नाही ते तुम्ही करत आहात, गुन्हेगार कोण आहे? बाळासाहेबांचं नाव न वापरता जनतेच्या समोर या, स्वत पक्ष काढा, भाजपामध्ये जा. आजही तुम्हाला शिवसेना पाहिजे, बाळासाहेब पाहिजेत पण बाळासाहेबांचा मुलगा नको 16 आमदारांवर टांगती तलवार असताना निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित नव्हता न्यायदेवतेवर आमचा विश्वास, न्यायदेवता न्याय देईल याची खात्री बाळासाहेबांचं नाव न वापरता जनतेच्या समोर या, स्वत पक्ष काढा, भाजपामध्ये जा. आजही तुम्हाला शिवसेना पाहिजे, बाळासाहेब पाहिजेत पण बाळासाहेबांचा मुलगा नको 16 आमदारांवर टांगती तलवार असताना निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित नव्हता न्यायदेवतेवर आमचा विश्वास, न्यायदेवता न्याय देईल याची खात्री तीन नावं दिली शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयानंतर ‘मातोश्री’वर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, सुभाष देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर भास्कर जाधव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता. ( शिवसेनेचं ठरलं! ‘ही’ 3 चिन्ह आणि 3 नावं फायनल! ) आम्ही सगळे जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटलो आहे. जो काही निर्णय झाला आहे. जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. परंतु, माझ्या सुचना आहे, आपल्या लोकांना संयम बाळगावा. उद्धव ठाकरे लवकरच जनतेशी संवाद साधणार आहे. निवडणूक आयोगाने आमचे सर्व मार्ग बंद केले. जनतेच्या न्यायालयात आमचा फैसला होईल, निवडणुकांमध्ये जनता न्याय देईल, जनतेच्या मनात प्रचंड असंतोष असल्याचं जाणवतंय, अनेक शिवसैनिकांना रडू आवरत नाही. जनतेला संयम बाळगायला सांगा असा उद्धव ठाकरे यांचा संदेश आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.