जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivsena VS Shinde : शिवसेनेचं ठरलं! 'ही' 3 चिन्ह आणि 3 नावं फायनल!

Shivsena VS Shinde : शिवसेनेचं ठरलं! 'ही' 3 चिन्ह आणि 3 नावं फायनल!

शिवसेनेकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं ठरवण्यात आली आहे.

शिवसेनेकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं ठरवण्यात आली आहे.

शिवसेनेकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं ठरवण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 09 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून तीन चिन्ह आणि तीन नावं निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, सुभाष देसाई उपस्थित होते. .या बैठकीनंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. नोटाबंदीनंतर पंतप्रधान मोदी हे घासलेलं, संपलेलं नाणं आहे. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं खणखणीत नाणं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ‘मी भाजपशी लढलो, कुटुंबातील लोकांशी लढलो. ही लढाई लढून मी आपल्या पक्षाचे 63 आमदार निवडून आणले.आता ही शेवटची निवडणूक आहे. आता आपण जिंकलो तर आपलं सगळं मिळवलं. हा निखाऱ्यांवरचा प्रवास आहे. या प्रवासात तुम्ही माझ्या सोबत आहात, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना केलं. शिवसेनेकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं ठरवण्यात आली आहे. तसंच शिवसेना बाळासाहेब ठाकरे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे अशी नावं देण्यात आली आहे, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली. (Shivsena VS Shinde : ‘धनुष्यबाण’ आधी शिवसेनेकडे नव्हते, असे मिळवले निवडणूक चिन्ह !) दरम्यान, आम्ही सगळे जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटलो आहे. जो काही निर्णय झाला आहे. जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. परंतु, माझ्या सुचना आहे, आपल्या लोकांना संयम बाळगावा. उद्धव ठाकरे लवकरच जनतेशी संवाद साधणार आहे. निवडणूक आयोगाने आमचे सर्व मार्ग बंद केले. जनतेच्या न्यायालयात आमचा फैसला होईल, निवडणुकांमध्ये जनता न्याय देईल, जनतेच्या मनात प्रचंड असंतोष असल्याचं जाणवतंय, अनेक शिवसैनिकांना रडू आवरत नाही. जनतेला संयम बाळगायला सांगा असा उद्धव ठाकरे यांचा संदेश आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. पर्यायी चिन्ह आणि पक्षाचं पर्यायी नाव निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. पर्यायी चिन्ह पोहोचवण्यासाठी आज 2 पर्यंतची मुदत होती आमच्याकडून चिन्ह पोहचवण्याचे काम झालं आहे. बघू निवडणूक आयोगाचा निर्णय काय येतो, असंही जाधव म्हणाले. ( ‘तर माझ्या पक्षाचं नाव आणि चिन्ह घ्या..’; रवी राणांची एकनाथ शिंदेंना ऑफर ) शिवसेना पक्ष नसून कुटुंब आहे. हे दसरा मेळाव्याला सर्वांनी पाहिलं. राजकीय वल्गना करून आपल्या आईला विकलं. आमच्यातलेच एकनाथ शिंदे यांनी आम्हाला या उंबरठ्यावर आणलं त्यांच्याबद्दल चीड जनतेच्या मनात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला आशा पद्धतीने घेरलं. चड्डा नड्डा असे वाचाळवीर येऊन बोलत होते, शिवसेना संपवणार नड्डा साहेब बोलले पण बाळासाहेबांची चिंगारी आणि उद्धव ठाकरे यांना मात्र तुम्ही संपवू शकत नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात