जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मिळाला नवा मुहूर्त, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मिळाला नवा मुहूर्त, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मिळाला नवा मुहूर्त, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री असतील, तर काँग्रेसच्या वाट्याला 10 मंत्रिपदे येणार असल्याची माहिती आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 डिसेंबर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र काँग्रेस हायकमांडकडून पक्षातील मंत्र्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात न आल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला. मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे. 30 डिसेंबरला दुपारी 1 वाजता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षातील मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री असतील, तर काँग्रेसच्या वाट्याला 10 मंत्रिपदे येणार असल्याची माहिती आहे. अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ? राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छुक आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील आणि अजित पवार हे तीन नेते आघाडीवर आहेत. मात्र उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे. पृथ्वीराज चव्हाणांकडे मोठी जबाबदारी? काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता कारण राष्ट्रवादीत अजित पवार यांचा समर्थक मोठा गट आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी त्यांच्या समर्थकांचा पक्षावर दबाव आहे. त्यामुळे सरकारला स्थिरता आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून कुणाला मिळणार संधी? मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवायची की पृथ्वीराज चव्हाण यांना नेमायचे याबाबत अजून अंतिम निर्णय येणं बाकी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात