Home /News /maharashtra /

सेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना निवडणुकीत पहिलं यश; सोलापूरमधून ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी

सेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना निवडणुकीत पहिलं यश; सोलापूरमधून ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी

सोलापूर दक्षिण तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे  7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहे.  त्यामुळे उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

    सोलापूर 05 ऑगस्ट : राज्यातील ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेच्या अडचणी काही केल्या कमी होत नव्हत्या. अशात आता उद्धव ठाकरे गटासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. सोलापूर दक्षिण तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे  7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहे.  त्यामुळे उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. सोलापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहिलं खातं उघडण्यास सुरुवात केली आहे.  दक्षिण सोलापूर तालुका युवासेना प्रमुख धर्मराज बगले यांनी चिंचपूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे. महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार; काँग्रेस नेत्यांची धरपकड, संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका देत उद्धव ठाकरे गटाने इथे झेंडा फडकवला आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. दुसरीकडे बार्शी तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतीवर मात्र राऊत गटाने झेंडा फडकवला आहे. बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाचा याठिकाणी विजय झाला आहे. तर माजी आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा पराभव झाला आहे. पानगाव ग्रामपंचायतीमध्ये राऊत गटाचे 11 तर सोपल गटाचे 4 सदस्य विजयी झाले आहेत. तर वांगरवाडी-तावरवाडी ग्रामपंचायतीत सातही जागांवर राऊत गटाचा विजय झाला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Gram panchayat, Solapur, Uddhav thackeray

    पुढील बातम्या