Home /News /maharashtra /

महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार; काँग्रेस नेत्यांची धरपकड, संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार; काँग्रेस नेत्यांची धरपकड, संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नुकतंच पोलिसांनी संजय निरुपम यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. काँग्रेस नेत्यांना त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्याचं पोलिसांचं नियोजन आहे.

    मुंबई 05 ऑगस्ट : महागाई, जीएसटी आणि तपास यंत्रणाच्या गैरवापराच्या मुद्यावरुन काँग्रेस आज शुक्रवारी देशभरात निदर्शने करणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यासाठी मोर्चाबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच पोलिसांनी संजय निरुपम यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. काँग्रेस नेत्यांना त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्याचं पोलिसांचं नियोजन आहे. आणखी एक धक्का; कुस्तीगीरनंतर या संघटनेतील अध्यक्षपदही पवारांच्या हातून जाणार, अजित दादांना द्यावा लागणार राजीनामा मलबार हिलकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. पोलीस प्रत्येक कार, टॅक्सी आणि बसच्या आतही तपासत आहेत, काँग्रेस कार्यकर्ते लपून आतमध्ये जात आहेत का हे पाहण्यासाठी ही तपासणी सुरू आहे. संजय निरूपम यांना ताब्यात घेत पोलिसांनी वर्सोवा पोलीस स्टेशनला नेलं आहे. संजय राऊतांना अटक, तरी शरद पवार शांत का? भुजबळांनी दिलं उत्तर काँग्रेस पक्षाचे नेते आज राजभवनापर्यंत मार्च काढून राज्यपालांना निवेदन सुपूर्द करणार आहेत. निदर्शनांवर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. पक्षाने ब्लॉक-जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांनाही मुख्यालयाबाहेर निदर्शने करुन अटक करवून घेण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या कार्यकर्तेही जमायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजभवनाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली आहे.  प्रत्येक वाहन आणि त्यातील प्रवासी यांची पोलीस तपासणी करत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Sanjay nirpuam

    पुढील बातम्या