मुंबई, 24 नोव्हेंबर : मागच्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले होते. यावरूर राज्याच्या राजकारणात चांगलाच हलकल्लोळ माजला होता. भाजपकडून यावर रान उठवत राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला होता. तसेच राहुल गांधी यांनी सावकरांवर वादग्रस्त वक्तव्य करुनही उद्धव ठाकरे गप्प का असा सवालही भाजपकडून विचारण्यात आला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर चांगलीच टीका केली आहे.
यावेळी ठाकरे म्हणाले की, पण छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांनी आम्हाला सावरकरांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करू नये. सावकरांचा अपमान झाल्यावर आम्ही गप्प राहिलो नाही आम्ही तात्काळ त्यावर पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त केला आहे. यावर राहुल गांधी यांनी तो विषय टाळला आहे. मात्र त्यावेळी हे भाजपवाले राहुल गांधी यांच्या अंगावर गेले होते पंरतु आता छत्रपतींचा अपमान होत आहे पण हे आता अंगावर जाताना नाही दिसत. असे ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : ‘आमदार गुजरातला नेले, प्रकल्प पळवले, अन् आता…’, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
राहुल गांधी यांना जसा विरोध केला तसा यांनी कोश्यारींच्या वक्तव्याचा विरोध करून दाखवावा. ते आता कोश्यारींना जोडे मारणार का असे म्हणत त्यांनी जोरदार प्रतित्त्युर दिले आहे. दरम्यान यानंतर संजय राऊत यांनीही महाविकास आघाडीला तडे पडतील असे वक्तव्य केले होते. परंतु भाजपवाले कोश्यारी यांच्या वक्तव्यावर बोलताना दिसत नसल्याचे ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं. जशी आम्ही सावरकरांच्या बाबतीत घेतली होती तशीच भूमिका मिंदे गटाने घ्यावी असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे गटावर हल्ला चढवला.
कर्नाटक मुख्यमंत्र्यावर ठाकरी बाणा
गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहातोय, महाराष्ट्रात खोके सरकार किंवा मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची सातत्याने अवहेलना होते आहे. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारल आहे. जणूकाही महाराष्ट्रात माणसं राहातच नाहीत. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाहीये. कुणीही यावे, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावे, हे आता खूप झाले.
महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
हे ही वाचा : जे कधी मंदिरात जात नाहीत त्यांनी… शिंदे गटाचा शरद पवारांवर पलटवार
पक्षाचे नेते किंवा राज्याचे मुख्यमंत्री, विशेषत: भाजपाच्या अखत्यारीतले, त्यांच्या वरीष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू-चालू शकतात का? ते नसेल, तर मग बोम्मई जे काही बोललेत, हे त्यांच्या वरीष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? म्हणजे भाजपाचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न, उद्योगधंदे इतरत्र पळवून महाराष्ट्र कंगाल करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? याचं उत्तर त्यांनी दिले पाहिजे”, अशा शब्दातं उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.