मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उदयनराजेंनी हातात घेतला कटोरा! Lockdown च्या विरोधात साताऱ्यात 'भीक मांगो' आंदोलन; पाहा VIDEO

उदयनराजेंनी हातात घेतला कटोरा! Lockdown च्या विरोधात साताऱ्यात 'भीक मांगो' आंदोलन; पाहा VIDEO

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले चक्क आंब्याच्या झाडाखाली पथारी पसरून समोर थाळी घेऊन बसले. सरकारने दुकानं सुरू ठेवू द्यावी असं सांगत त्यांनी Lockdown विरोधात भीक मांगो आंदोलन केलं. पाहा VIDEO

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले चक्क आंब्याच्या झाडाखाली पथारी पसरून समोर थाळी घेऊन बसले. सरकारने दुकानं सुरू ठेवू द्यावी असं सांगत त्यांनी Lockdown विरोधात भीक मांगो आंदोलन केलं. पाहा VIDEO

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले चक्क आंब्याच्या झाडाखाली पथारी पसरून समोर थाळी घेऊन बसले. सरकारने दुकानं सुरू ठेवू द्यावी असं सांगत त्यांनी Lockdown विरोधात भीक मांगो आंदोलन केलं. पाहा VIDEO

सातारा, 10 एप्रिल : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) सुरू आहे. यादरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन (Maharashtra break the chain) अंतर्गत अत्यंत कडक निर्बंध लावले जात आहेत. राज्यात काही ठिकाणी याला विरोधही होताना दिसत आहेत. साताऱ्यात तर स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन केलं आहे. साताऱ्याच्या पोवईनाका (Satara powai naka andolan) परिसरात उदयनराजे यांच्या  (Udayan Raje bhik mango andolan in satara) नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून बसत थाळी ठेवून राजेंनी चक्क  भीक मागो आंदोलन केलं.

वाचा - लसीकरणानंतरही अनेकांचा कोरोना अहवाल का येतोय पॉझिटिव्ह? वाचा महत्त्वाची कारणं

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला सातारा जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसूम होतं. मात्र, या लॉकडाउनला साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. येथील पोवई नाक्यावर त्यांनी हातात थाळी घेऊन भीक मागो आंदोलन करत त्यांनी निषेध केला. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या तुघलकी कारभाराचाही निषेध व्यक्त केला. उदयनराजे यांनी यावेळी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवरून राज्य सरकारवर टीका केली.

उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारीच व्यापाऱ्यांच्या पाठिशी असल्याचं सांगत अगदी थेटपणे त्यांची भूमिका मांडली होती. वापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली तर खायचं काय असा सवाल करत त्यांनी लॉकडाऊनला स्पष्टपणे विरोध केला. त्यानंतर शनिवारी त्यांनी व्यापाऱ्यांसह थेट आंदोलनातच सहभाग घेत लॉकडाऊनला विरोध केला आहे. साताऱ्याच्या पोवईनाका याठिकाणी फुटपाथवर आंदोलन केलं आहे. अशा प्रकारचे निर्बंध लावले तर व्यापाऱ्यांवर भीक मागायची वेळ येईल, असं सांगत उदयनराजे यांनी याठिकाणी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पोवईनाका परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

वाचा - Lockdown ला विरोध करत उदयनराजेंचं बेधडक मत - 'कुटुंब नियोजन केलं असतं तर...'

उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी केली होती. पण निर्णय राज्यसरकारचा असल्याने तो रद्द करू शकत नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर व्यापाऱ्यांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळं त्यांच्यावर, त्यांच्याकडे काम करत असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना हा फक्त शनिवारी आणि रविवारीच बाहेर येतो का? असं विचारत त्यांनी सरकारच्या नियमांवर टीका केली. मी जर व्यापारी असतो तर काहीही झालं तरी दुकान बंद केलं नसतं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. सरकारनं योग्य तो मार्ग काढून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करताना सरकारच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले होते.

यानुसार उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊनला विरोध करत थेट आंदोलनात उतरले आहेत. सरकारनं व्यापाऱ्यांचं आणि तिथं काम करणाऱ्यांचं लसीकरण करावं आणि त्यांना दुकानं सुरू ठेवू द्यावी असं मत, उदयनराजे भोसले यांनी मांडलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Satara, Udayan raje bhosle