नवी दिल्ली, 10 एप्रिल: भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण (Corona Vaccination Drive) सुरू आहे. सध्या देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू असून 45 वर्षावरील सर्व व्यक्तींना लस दिली जात आह. दरम्यान आता आणखी एका समस्येनं डोकं वर काढलं आहे. कोरोना लस घेऊनही अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) आल्याची प्रकरणं समोर आली आहेत. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (Sanjay Gandhi Post Graduate Institute of Medical Sciences SGPGIMS) चे डिरेक्टर आर के धीमान आणि त्याच्या पत्नीने लसीचे दोन्ही डोस घेऊनही होळीच्या तीन दिवसांपूर्वी त्यांची कोव्हिड टेस्ट सकारात्मक आली होती.
असे असले तरी डॉ. धीमान यांनी लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले, कारण त्यांच्या मते रुग्णालयात भरती होण्यापासून तसंच कोरोनामुळे मृत्यू ओढावण्यापासून वाचण्यासाठी
लस प्रभावी आहे. शिवाय जरी लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी यावेळी संक्रमणामध्ये लक्षणं अत्यंत सौम्य असतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
(हे वाचा-घाबरू नका, पण सावध राहा! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तज्ज्ञांकडून दिलासादायक बातमी)
टाइम्स ऑफ इंडियामधील अहवालानुसार, कोव्हिड-19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीचे (KGMJ) कुलगुरू लेफ्टनंट प्रो. बिपिन पुरी यांना 11 दिवसांनी पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाली, तरीही ही लस गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. डी हिमांशू यांना देखील दोन्ही डोस घेऊन कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.
लसीकरणानंतर एखाद्याला कोरोना होऊ शकतो का?
अमेरिकेतील काही लोकांना कोरोना लस घेऊनही कोरोना झाल्याचं समोर आलं होते. या केसेसना breakthrough cases असं संबोधण्यात आलं, ज्यांनी अधिक चिंता वाढवली आहे. दरम्यान काही अभ्यासांमधून म्हटले आहे की, शक्यता खूप कमी असली तरी या breakthrough cases शक्य आहेत, जरी तुम्ही घेतलेले व्हॅक्सिन सर्वाधिक प्रभावी असले तरीही. अमेरिकेचे आघाडीचे शास्त्रज्ञ Anthony Fauci यांनी यांनी देखील यास दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते तुम्ही कोट्यवधी लोकांचे लसीकरण करता तेव्हा अशाप्रकारचे संक्रमण पाहायला मिळूच शकते. अँटनी हे अमेरिकेतील आघाडीचे वैज्ञानिक तर आहेतच पण त्याचबरोबर व्हाइट हाऊस कोव्हिड-19 ब्रिफिंगमध्ये ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन डिसीजेसचे डिरेक्टर आहेत.
2 एप्रिल रोजी, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (Centers for Disease Control and Prevention CDC) च्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की दोन डोस व्हॅक्सिनचा खुराक दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यानंतर 90 टक्के संक्रमण रोखण्यासाठी सुसज्ज असतो. तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला fully vaccinated म्हणू शकता.
लस घेऊनही पुन्हा का होतंय संक्रमण?
लस घेऊनही कोरोना संक्रमण होण्याची विविध कारणं असू शकतात. यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लशीचे सदोष व्यवस्थापन. तज्ज्ञांनी अशी चेतावणी दिली होती की ही लस दुर्मिळ आहे, शिवाय लस चुकीच्या पद्धतीने हाताळणे - आवश्यक तापमान न राखणे किंवा हाताच्या चुकीच्या भागावर डोस दिल्यास पुन्हा संक्रमण होऊ शकते. दुसऱ्या डोसपूर्वी तुम्ही कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तरी देखील कोरोनाचे संक्रमण होऊ शकते.
(हे वाचा-महाराष्ट्रात चाललंय तरी काय! 2 आठवड्यांत 4 कोव्हिड सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी)
अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स येथील सीव्हीएस फार्मसीने फेब्रुवारी महिन्यात काही रूग्णांना पूर्ण आणि अधिक प्रभावी औषधाऐवजी अर्धवट डोस दिल्यानंतर जाहीर क्षमा मागितली होती.
एखाद्या व्यक्तीमध्ये कमकुवत प्रतिकारशक्ती (Weak immune response) हा आणखी एक घटक असू शकतो. कमकुवत प्रतिकारशक्ती दीर्घकाळापर्यंत औषधोपचार, वैद्यकीय उपचार किंवा अनुवांशिक मतभेदांमुळे असू शकते. वयानुसार देखील रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत होऊ शकते. लशीची क्लिनिकल चाचणी वृद्ध प्रौढांमध्ये उच्च कार्यक्षमता दाखवते.
लसीनंतर रोग प्रतिकारशक्ती किती काळ टिकते?
अधिकाधिक लसी तयार झाल्यावर, रोग प्रतिकारशक्ती किती काळ टिकते हे पाहण्यासाठी यासाठी विविध स्तरावर अभ्यास सुरू आहे. यामध्ये हे तपासणे चालू आहे की, लसीकरण झालेले लोक विषाणूचा प्रसार करू शकतात का आणि व्हायरस इतका म्युटेट होऊ शकेल का ज्याठिकाणी लस अजिबात प्रभावी होणार नाही. मिशिगन मेडिसीन याठिकाणी सूक्ष्मजीवशास्त्र आणि रोग प्रतिकारशक्तीच्या प्राध्यापक असणाऱ्या बेथ मुरी यांच्यामते सर्व व्हायरस त्यांच्या शेवटच्या बिंदूपर्यंत म्युटेट होतात. त्यांच्या मते, 'यामध्ये आनंदाची बातमी अशी आहे की, लस तरीही प्रभावी असते कारण म्युटेशनमध्ये स्पाइक प्रोटीनची मूलभूत रचना इतकी बदलत नाहीत की अँटीबॉडीज प्रभावी ठरणार नाहीत.'
कालांतराने लशींमध्ये आणखी बदल करण्याची गरज आहे का हे पाहण्यासाठी तज्ज्ञ गेल्या वर्षभरात कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमध्ये झालेल्या बदलावाचा अभ्यास करत आहेत.
31 मार्च रोजी नॅशनल AEFI कमिटीला केलेल्या सादरीकरणात असे दिसून आले होते की लसीकरणानंतर 180 लोकांचा मृत्यू झाला होता आणि यातील चारपैकी तीन व्यक्तींचा मृत्यू लस घेतल्यानंतर तीन दिवसाच्या आत झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona hotspot, Corona spread