Home /News /maharashtra /

'तो' व्हायरल व्हिडीओ एडिट केलेला, उदय सामंताकडून खासदार पुत्राची पाठराखण

'तो' व्हायरल व्हिडीओ एडिट केलेला, उदय सामंताकडून खासदार पुत्राची पाठराखण

निलेश राणे यांनी केलेल्या ट्वीटमधील व्हिडीओ मोडून तोडून तयार केला आहे. गीतेश राऊत मद्यपान करत नाही, आमच्यासाठी हा विषय संपला आहे

कोल्हापूर, 19 जुलै: शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊतचा पोलिसांशी हुज्जत घालतानाचा एक व्हिडिओ माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. खासदार राऊत यांचा मुलगा गीतेश हा पोलिसाला दमबाजी करून कर्तव्यात अडथळा निर्माण करत आहे. खासदार पुत्रानं मद्यपान केल्याचा दावा निलेश राणे यांनी केला होता. मात्र, व्हायरल व्हिडीओ हा एडिट केलेला असल्याचं रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. विनायक राऊत यांची मुले ही निर्व्यसनी असल्याचंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं आहे. हेही वाचा...बीकेसी कोविड सेंटरच्या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार, भाजप आमदाराचा सणसणीत आरोप निलेश राणे यांनी केलेल्या ट्वीटमधील व्हिडीओ मोडून तोडून तयार केला आहे. गीतेश राऊत मद्यपान करत नाही, आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असं उदय सामंत यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं मी खासदार विनायक राऊतांचा मुलगा, बघून घेतो तुला? शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याने कणकवलीमध्ये पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याचा आरोप करत एक व्हिडिओ माजी खासदार निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट केला होता. निलेश राणे यांनी गीतेश राऊतांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. निलेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 22 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. कणकवलीमध्ये एका चौकात गीतेश राऊत यांची गाडी पोलिसांनी अडवली आहे. यावेळी गीतेश राऊत आणि एका पोलिसात गाडी वळवण्यावरून वाद झाला आहे. यावेळी, गीतेश राऊत यांनी दुसऱ्या पोलिसाला, 'मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे, याने मला शिवी दिली, याला मी सोडणार नाही' असं म्हणत असल्याचं दिसून आलं आहे. तर संबंधीत पोलिसाने, गीतेश राऊत यांनीच पहिले शिवी दिल्याचं म्हणत आहे. तसंच, माझी नोकरी घालवणार तू कोण? असा सवाल केला आहे. या 22 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कणकवलीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काय म्हणाले होते निलेश राणे? या व्हिडिओबद्दल निलेश राणे म्हणाले की, 'शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलिसवाला ड्युटी करतोय आणि खासदाराचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतोय. दारू पिऊन गाडी वेडी वाकडी चालवली तर पोलीस पकडणारचं. ही Section 353 आणि 185 अंतर्गत केस बनते.' तर या प्रकरणी आधी तक्रार दाखल झाली पाहिजे. तक्रार नोंदवली नसेल तर चौकशी कशी होणार? ज्या भाषेत विनायक राऊतांचा मुलगा पोलिसांशी बोलत आहे, त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली. माझा मुलगा साधी सुपारी सुद्धा खात नाही! खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणावर खुलासा केला होता. 'दारू पिऊन पोलिसांनी हुज्जत घालण्याचा कुणी आरोप करत असेल तर माझा मुलगा साधी सुपारी सुद्धा खात नाही. त्यामुळे तरीही मी पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.' ही गाडी माझ्याचं मुलाची असून गाडीत गीतेशच आहे. हेही वाचा...मानलं पुणेकराला, कोरोनाबाधित आजींना पाठीवर बसून डोंगरावरून खाली आणलं या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. जर माझा मुलगा जर दोषी असेल तर कारवाई करावी किंवा जर पोलीस दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Nilesh rane, Uday samant, Vinayak Raut

पुढील बातम्या