कोकण आणि शिवसेना (ShivSena) यांचं वेगळंच नातं आहे. मूळचा कोकणातला असलेला चाकरमानी शिवसेनेशी भावनिकरीत्या जोडला गेला आहे. कोकणानं शिवसेनेला चांगले नेते दिले आहेत. नारायण राणे (Narayan Rane) शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोकणात शिवसेनेचं काय होणार हा प्रश्न अनेकांना पडला होता; पण तिथे शिवसेना फक्त टिकलीच नाही तर वाढलीसुद्धा. कोकणात शिवसेनेचं वर्चस्व कायम राखण्यात मोठा वाटा उचलला तो विनायक भाऊराव राऊत (Vinayak Raut) यांनी. विनायक राऊत हे शिवसेनेतले जुन्या फळीतले ज्येष्ठ नेते. खासदार विनायक राऊत यांना दिल्लीतला शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखलं जातं. संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यापाठोपाठ दिल्लीत त्या