रत्नागिरी 14 ऑक्टोबर : भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेवर उदय सामंत यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलं आहे. गरज पडल्यास भाजपला उत्तर देण्याची धमक आमच्यात असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. यासोबतच प्रत्येकवेळी कोणी काही बोललं तर त्याला उत्तर देणं गरजेचं नसतं, असं म्हणत त्यांनी भास्कर जाधव यांच्यावरही निशाणा साधला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी शिवसेना-काँग्रेस धक्का, 4 नगरसेवक भाजपमध्ये दाखल भाजपची आजपर्यंतची निती आणि वर्तवणूक पाहता शिंदे गटाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपशीच संघर्ष करावा लागणार असल्याचं भास्कर जाधव म्हणाले होते. यावर उदय सामंत म्हणाले, की ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करत आहे किंवा आमच्याकडून काही करून घेते आहे, असं आम्हाला वाटेल त्यावेळी त्यांना उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे.’ उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - यावेळी बोलताना उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोपही केला आहे. देशात सर्वात मोठा घोटाळा तेलगी स्टॅम्पचा झाला होता. त्यानंतरचा मोठा घोटाळा आता झाला आहे, असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जवळपास शंभर कोटींचे स्टॅम्प खरेदी केले असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळेच त्याचा तपास होणं गरजेचं असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते चिपळूणमध्ये बोलत होते. CM Eknath Shinde : ठाकरे गट झाला आता राष्ट्रवादी, जिल्हाप्रमुखच मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, दिली मोठी जबाबदारी सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. याबाबत उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की ‘आमचाच उमेदवार निवडून येईल. आम्ही कशा पद्धतीने तयारी केली, उमेदवार निवडून आणण्यासठी कशापद्धतीने जोर लावला जाईल हे समोरच्याला कळेलच. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवार आम्ही उभा करणार आहोत. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे घोषणा करतीलच, आमचा उमेदवार विजयी होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.