मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डोंबिवली हादरली, दोन तरुणांना रिक्षातून बाहेर काढून लुटले, एकाच आढळला छिन्नविच्छीन्न अवस्थेत मृतदेह

डोंबिवली हादरली, दोन तरुणांना रिक्षातून बाहेर काढून लुटले, एकाच आढळला छिन्नविच्छीन्न अवस्थेत मृतदेह

 
रात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वे समांतर रस्त्यावर काही जणांनी त्यांची रिक्षा अडवली. दोघांना बाहेर काढले आणि...

रात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वे समांतर रस्त्यावर काही जणांनी त्यांची रिक्षा अडवली. दोघांना बाहेर काढले आणि...

रात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वे समांतर रस्त्यावर काही जणांनी त्यांची रिक्षा अडवली. दोघांना बाहेर काढले आणि...

  • Published by:  sachin Salve

डोंबिवली, 05 ऑक्टोबर : डोंबिवलीमध्ये (dombivali) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. रिक्षातून जाणाऱ्या दोन तरुणांना चाकूचा (knives) धाक दाखवून निर्जनस्थळी नेऊन लुटण्यात आले.  या घटनेत एका तरुणाचा मृत्यू (murder) झाला असून रेल्वे रुळालगत छिन्नविच्छीन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये खळबळ उडाली आहे.

ठाकुर्ली परिसरातील (thakurli) रेल्वे समांतर रोडवर ही घटना घडली आहे.  बेचनप्रसाद चौहान (bechenprasad Chauhan) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर बबलु चौहान (bablu Chauhan) असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. बेचनप्रसाद चौहानचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे, असे वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे.

धोक्याची घंटा! पाकिस्तान-अफगाण सीमेवर भरतोय शस्त्रास्त्रांचा ‘बुश बाजार’

बबलु आणि बेचन हे दोघेही डोंबिवलीतील पूर्व भागात शेलारनाका परिसरात भाड्याने राहत होते. दोघेही जण एका फर्निचरच्या दुकानावर कामाला आहे. सोमवारी रात्री दोघेही उत्तर प्रदेशला जाण्यासाठी निघाले होते. घरातून निघाल्यानंतर रिक्षाने ते रेल्वे स्टेशनला जात होते.

रात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वे समांतर रस्त्यावर काही जणांनी त्यांची रिक्षा अडवली. दोघांना बाहेर काढले आणि रिक्षाचालकाला पळवून लावले. त्यानंतर दोघांनाही चाकूचा धाक दाखवून ठाकुर्ली- कल्याण दरम्यान रेल्वे रुळाजवळ नेण्यात आले होते. तिथे नेल्यावर दोघांवर चाकूने वार करण्यात आले. पण, सुदैवाने बबलूने कशीबशी सुटका करून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, बेचन तिथेच अडकला. जीवमुठीत धरून बबलू आपल्या परिसरात परत आला. त्याने या घटनेबाबात स्थानिक भाजप जिल्हाध्यक्ष कांबळे यांना माहिती दिली.

Government Jobs: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सोलापूर इथे मोठी पदभरती

त्यानंतर टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेण्यात आली. बबलूच्या सांगण्यावरून पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तेव्हा बेचनचा मृतदेह (dead body found in railway track) आढळून आला. रुळावर छिन्नविच्छीन्न अवस्थेत बेचनचा मृतदेह आढळून आला होता. चोरीच्या उद्देशाने ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

First published: