मराठी बातम्या /बातम्या /विदेश /धोक्याची घंटा! पाकिस्तान-अफगाण सीमेवर भरतोय शस्त्रास्त्रांचा ‘बुश बाजार’, अनेक दशकांनंतर धंदा तेजीत

धोक्याची घंटा! पाकिस्तान-अफगाण सीमेवर भरतोय शस्त्रास्त्रांचा ‘बुश बाजार’, अनेक दशकांनंतर धंदा तेजीत

अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजांनी माघार (Weapon market rising in Pakistan-Afghanistan border) घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांच्या बाजारात तेजी आली आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजांनी माघार (Weapon market rising in Pakistan-Afghanistan border) घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांच्या बाजारात तेजी आली आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजांनी माघार (Weapon market rising in Pakistan-Afghanistan border) घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांच्या बाजारात तेजी आली आहे.

काबुल, 5 ऑक्टोबर : अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजांनी माघार (Weapon market rising in Pakistan-Afghanistan border) घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांच्या बाजारात तेजी आली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमाभागात कुठलाही कायदा (No rule of law in border area) चालत नसून टोळीयुद्धाच्या आधारावर इथलं वर्चस्व ठरवलं जात आहे. त्यामुळे आपलं वर्चस्व राखण्यासाठी शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याकडे (Various gangs buying weapons) इथल्या टोळ्यांचा कल आहे. परिणामी या दोन देशांदरम्यान असणाऱ्या सुमारे 2600 किलोमीटरच्या परिसरात शस्त्रांचा बाजार भरला आहे.

आधुनिक शस्त्रंही उपलब्ध

या भागातील शस्त्रास्त्रांच्या बाजारात अमेरिकी एम-4 पिस्तुल असो किंवा इतर आधुनिक बंदुका, सर्व प्रकारचा माल मिळतो. ऑर्डर दिल्यानंतर लगेचच त्याची डिलिव्हरी केली जाते. अमेरिकी शस्त्रांसोबत इथं चिनी शस्त्रं आणि स्थानिक कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या बंदुका आणि कट्ट्यांचीही विक्री केली जाते. ही सगळी हत्यारं सीमाभागातील ‘बुश बाजार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाजारपेठेत विक्रीसाठी येत असतात.

व्हिडिओ कॉलवर बुकिंग

या शस्त्रांची ऑर्डर व्हिडिओ कॉल करून देता येते आणि त्यानंतर एका दिवसात ही शस्त्रं दिलेल्या पत्त्यावर पाठवली जातात. सुमारे दोन शतकांपासून शस्त्रांच्या व्यवहारात सहभाग असलेले अहमद भविष्याचा वेध घेताना सांगतात की पुढच्या काळात शस्त्रांची मागणी वाढत जाणार आहे. या भागात कुठल्याच सरकारचा शब्द चालत नाही. इथे फक्त टोळ्यांचं राज्य असतं. एक टोळी दुसऱ्या टोळीवर आक्रमण करते आणि तो प्रदेश काबीज करते. त्यामुळे ज्याच्याकडे अधिक ताकद, तो तिथला राजा असतो. अमेरिकेनं माघार घेतल्यानंतर आता उरलीसुरली कायदा-सुव्यवस्थादेखील संपुष्टात आल्यामुळे भविष्यात शस्त्रांच्या बाजारात अधिक मागणी नोंदवली जाण्याचा अंदाज आहे.

हे वाचा - Facebook डाउनचा मोठा फटका, काही तासात झुकेरबर्ग यांचं 5,21,90,70,50,000 नुकसान

अमेरिकेच्या माघारीनंतर मोकळे रान

अमेरिकेची अफगाणिस्तानमध्ये सत्ता असताना छुप्या मार्गाने शस्त्रं पाकिस्तानत आणली जात होती. मात्र आता खुलेआम ही तस्करी सुरु असल्याचं चित्र आहे. दोन्ही देशातील नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा असून भारत आणि इतर देशांनाही याचा भविष्यात फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Pakisatan, Weapons