सोलापूर, 05 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सोलापूर (Mahatransco Solapur Recruitment 2021) इथे 10वी पास उमेदवारांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jobs in Solapur) जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
अप्रेन्टिस (इलेक्ट्रिकल) Apprentice (Electrical) - एकूण जागा 63
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अप्रेन्टिस (इलेक्ट्रिकल) Apprentice (Electrical) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि त्यांनतर ITI पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
हे कागदपत्रं आवश्यक
पासपोर्ट साईझ फोटो
ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म
शाळा सोडल्याचा दाखला
ITI प्रमाणपत्र
मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक.
आधार कार्ड, पासबुक आवश्यक.
काही महत्त्वाच्या सूचना
ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती आणि तपशील भरणं आवश्यक आहे.
उमेदवारांची निवड दहावी आणि ITI च्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे.
या गुणांची बेरीज करून त्यांची सरासरी काढली जाणार आहे. त्यानंतर मेरिट लिस्ट काढली जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | Mahatransco Solapur Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | अप्रेन्टिस (इलेक्ट्रिकल) Apprentice (Electrical) - एकूण जागा 63 |
शैक्षणिक पात्रता | दहावी आणि त्यांनतर ITI पर्यंत शिक्षण |
वयोमर्यादा | 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान |
हे कागदपत्रं आवश्यक | पासपोर्ट साईझ फोटो ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म शाळा सोडल्याचा दाखला ITI प्रमाणपत्र मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक. आधार कार्ड, पासबुक आवश्यक. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apprenticeshipindia.org/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
FSSAI मध्ये होणार भरती
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India) इथे 255 जागांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (FSSAI Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रधान व्यवस्थापक, सहाय्यक संचालक, उपव्यवस्थापक, अन्न विश्लेषक, तांत्रिक अधिकारी, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक, हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक, आयटी सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी ही भरती (FSSAI jobs) असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
या पदभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Solapur, जॉब