मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Devshayani Ekadashi 2022 : 10 जुलैला देवशयनी एकादशी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजेचा मुहूर्त

Devshayani Ekadashi 2022 : 10 जुलैला देवशयनी एकादशी; जाणून घ्या महत्त्व आणि पूजेचा मुहूर्त


देवशयनी एकादशीला हिंदू संस्कृतीमध्ये मोठं महत्त्व आहे. याच दिवशी भगवान विष्णुंसह इतर सर्व देव योगनिद्रेमध्ये जातात.

देवशयनी एकादशीला हिंदू संस्कृतीमध्ये मोठं महत्त्व आहे. याच दिवशी भगवान विष्णुंसह इतर सर्व देव योगनिद्रेमध्ये जातात.

देवशयनी एकादशीला हिंदू संस्कृतीमध्ये मोठं महत्त्व आहे. याच दिवशी भगवान विष्णुंसह इतर सर्व देव योगनिद्रेमध्ये जातात.

मुंबई, 02 जुलै : हिंदू संस्कृतीमध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. त्यातच आषाढ महिन्यातील एकादशी (Ashadh Ekadashi) ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2022) म्हणून साजरी केली जाते. या एकादशीला रूढ भाषेत आषाढी एकादशीही म्हणतात. या वर्षी ही एकादशी तिथी शनिवार 9 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजून 39 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 10 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 13 मिनिटांपर्यंत ही तिथी (Devshayani Ekadashi tithi) असणार आहे. त्यामुळे 10 जुलै रोजी या एकादशीचं व्रत केलं जाईल. काय आहे महत्त्व? देवशयनी एकादशीला हिंदू संस्कृतीमध्ये मोठं महत्त्व आहे. याच दिवशी भगवान विष्णुंसह इतर सर्व देव योगनिद्रेमध्ये जातात. तर, भगवान शंकर जागे राहून संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार पाहतात, अशी आख्यायिका (Devshayani Ekadashi importance) आहे. या देवशयनी एकादशीपासूनच चतुर्मासाची सुरुवात होते. या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कोणतंही शुभकार्य केलं जात नाही. भारतीय शुभकार्यांत पहिल्यांदा गणपतीला आणि मग अन्य देवतांना आवाहन केलं जातं. पण चातुर्मासात (Chaturmas) देव योगनिद्रेत असल्यामुळे लग्न, साखरपुडा, मुंज अशा प्रकारची कोणतीही शुभकार्य केली जात नाहीत. अर्थात, चातुर्मासाच्या कालावधीमध्ये तुम्ही देवपूजा नक्कीच करू शकता. त्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. यंदा चातुर्मासाचा कालावधी इंग्रजी कॅलेंडरनुसार 9 जुलै ते 18 नोव्हेंबर हा असणार आहे, अशी माहिती नई दुनिया या वेबसाईटने दिली आहे. तीन शुभ योग यंदाच्या देवशयनी एकादशीला (Devshayani Ekadashi Muhurta) तीन योग जुळून येत आहेत. रवी योग, शुभ योग आणि शुक्ल योग हे तिन्ही योग या एकादशीच्या कालावधीमध्ये येतील. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत, म्हणजेच रात्री 12 वाजून 45 मिनिटांपर्यंत शुभ योग असेल. त्यानंतर शुक्ल योग सुरू होईल. पहाटे 5.31 पर्यंत शुक्ल योग असेल. त्यानंतर रवी योग सुरू होईल, जो सकाळी 9.55 पर्यंत असेल. हे तिन्ही योग (Devshayani Ekadashi Shubha Yog) कोणत्याही कार्यासाठी शुभ असतात. 11 तारखेला असेल पारणं 10 जुलै रोजी हे व्रत करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 11 जुलै 22 रोजी पहाटे 5.31 ते सकाळी 8.17 या कालावधीमध्ये व्रताचं पारणं फेडावं. द्वादशीची तिथी सकाळी 11.13 वाजता समाप्त होईल. अशा प्रकारे तुम्ही योग्य मुहूर्तानुसार आपलं व्रत, पूजा आणि पारणं याचं नियोजन करू शकता.
First published:

Tags: Maharashtra News

पुढील बातम्या