खेड, 23 फेब्रुवरी : समोरील ट्रकला ओव्हरटेक करताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुंबई गोवा महामार्गावर मोरवंडे फाटा नजीक दुचाकी आणि टाटा गाडीमध्ये समोरासमोर ठोकर बसून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी गंगाराम आखाडे (वय 43, राहणार तिसंगी अखाडेवाडी ता.खेड) असे अपघातात मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. तर त्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेला नरेंद्र किशोर शिरकर (राहणार कळंबट , सुतारवाडी ता. चिपळूण) हा गंभीर जखमी झाला असून तो बेशुद्धावस्थेत आहे. त्याच्यावर लवेल येथील घरडा हॉस्पिटल येथे उपचार करून नंतर चिपळूण येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
Inside Story: सांगलीत नेमकं काय घडलं? भाजपकडे बहुमत असूनही राष्ट्रवादीचा महापौर
समोर चाललेल्या ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या चिपळूण ते मुंबईच्या दिशेने येणाऱ्या टाटा गाडीला समोर समोर जाऊन धडक दिली. या अपघातात संभाजी आखाडे जागीच मृत्युमुखी पडले तर नरेंद्र शिरकर हे गंभीर जखमी झाले.
ठाकरे सरकारचा मोदी सरकारला जोरदार झटका; Coronil बाबत घेतला मोठा निर्णय
हा अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. तर कारचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमी अवस्थेत जखमी नरेंद्र शिरकर यांना तातडीने चिपळूण येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bike accident, Chiplun, Gangaram akhade, Maharashtra, Mumbai case, Road accident