मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /ठाकरे सरकारचा मोदी सरकारला जोरदार झटका; Coronil बाबत घेतला मोठा निर्णय

ठाकरे सरकारचा मोदी सरकारला जोरदार झटका; Coronil बाबत घेतला मोठा निर्णय

कोरोनावरील उपचारासाठी मोदी सरकारनं ग्रीन सिग्नल दिलेल्या पतंजलीच्या कोरोनिल औषधाबाबत उद्धव ठाकरे सरकारनं आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

कोरोनावरील उपचारासाठी मोदी सरकारनं ग्रीन सिग्नल दिलेल्या पतंजलीच्या कोरोनिल औषधाबाबत उद्धव ठाकरे सरकारनं आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

कोरोनावरील उपचारासाठी मोदी सरकारनं ग्रीन सिग्नल दिलेल्या पतंजलीच्या कोरोनिल औषधाबाबत उद्धव ठाकरे सरकारनं आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

    मुंबई, 23 फेब्रुवारी : भारतातील सर्वाधिक प्रकरण महाराष्ट्रात आहेत. कोरोनावर (coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मोदी सरकारनं कोरोना लसीकरण मोहीम सुरू केलं आहे. शिवाय विविध औषधं वापरून कोरोना रुग्णांवर उपचारही सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं पतंजलीच्या (patanjali) कोरोनिल (coronil) औषधाला कोरोनावरील उपचारासाठी मंजुरी दिली. पण उद्धव ठाकरे सरकारनं मात्र या औषधाच्या विक्रीला राज्यात परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

    आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे. या औषधाच्या वापरामुळे 70 टक्के रुग्ण तीन दिवसात बरे होतील असा दावा  पतंजलीनं केला आहे. शिवाय CoPP - WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टिफिकेशन सिस्टमनुसार सहाय्यक औषध घोषित केल्याचंही सांगण्यात आलं. या कार्यक्रमात योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यासह केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.

    दरम्यान या औषधावर इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्षेप घेतला आहे. तसंच जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील आपण अशा कोणत्याच पारंपारिक औषधाला कोरोनावर उपचारासाठी परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

    हे वाचा - VIDEO: महापौर Kishori Pednekar यांच्याकडून मास्क वापरण्याबाबत जनजागृती

    त्यामुळे मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळालेल्या या औषधाला ठाकरे सरकारनं महाराष्ट्रात परवानगी देण्यास नकार दिला आहे.

    राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनिल औषधाला अधिकृत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

    हे वाचा - मुंबईकरांनो लस घेतली म्हणून बिनधास्त राहू नका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

    गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,  पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले असून WHO ने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईनं हे औषध बाजारात आणणं आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही. WHO, IMA आणि इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही.

    First published:
    top videos

      Tags: Anil deshmukh, Coronavirus, Covid19, India, Maharashtra, Uddhav thackeray