बुलडाणा 21 ऑगस्ट : राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटनाही घडत आहेत. पुरामध्ये अनेकजण वाहून गेल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशात आता बुलडाण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक महिला या घटनेत जखमी झाली आहे. वय अवघं 22 वर्ष, उसनवारीचे पैसे फेडू न शकल्याने खचला, बुलढाण्यात युवकाचं धक्कादायक कृत्य बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील निमकराळ येथे ही दुर्दैवी घटना घडली. आडोळ, मांडवा, तीवडी, गौलखेड, दादुलगाव या परिसरात अचानक ढगांच्या गडगडाटाला आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसात मोठ्या प्रमाणात वीजा चमकत होत्या. पाऊस सुरू झाला तेव्हा निमकराळ येथील अमोल रघुनाथ पिसे वय 22 वर्ष, मधूकर तुळशुराम उगले वय 56 वर्ष आणि त्यांच्या पत्नी यमुना मधूकर उगले वय 48 हे तिघेही शेतामध्ये होते. अचानक पाऊस येऊ लागल्याने घाईत त्यांनी शेतातीलच एका झाडाचा आसरा घेतला. मात्र, हा पाऊस मृत्यू घेऊन आला असल्याची कल्पनाही त्यांना नव्हती. IIT च्या विद्यार्थिनीच्या मृतदेहाने खळबळ, तरुणीच्या चेहऱ्यावर अन् डोक्यावर आढळल्या जखमा ही तिघेही पावसात भिजण्यापासून वाचण्याकरता झाडाखाली जावून बसले. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. काही वेळातच अचानक या झाडावर वीज कोसळली. या घटनेत झाडाखाली आसरा घेतलेल्या अमोल रघुनाथ पिसे आणि मधूकर तुळशुराम उगले या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर यमुना मधूकर उगले जखमी झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.