बुलढाणा, 20 ऑगस्ट : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय तरुणाने उसनवारीचे पैसे फेडू न शकल्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तरुणाच्या आत्महत्येनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणाने इतका टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, अशी भावना गावकरी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरा उबरा येथील एका युवकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. अविनाश धोगे असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. लोकांकडून उसनवारी म्हणून त्याने पैसे घेतले होते. त्या पैशांसाठी त्याला तगादा लावण्यात येत होता. पैसे येण्याचे कुठलेच साधन त्याच्याकडे नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. ( IIT च्या विद्यार्थिनीच्या मृतदेहाने खळबळ, तरुणीच्या चेहऱ्यावर अन् डोक्यावर आढळल्या जखमा ) अवघ्या 22 वर्षांचा हा तरुण उसनवारीच्या पैश्यावरून आत्महत्या करतो आणि शेवटचा निरोप घेतो त्यामुळे गावात संतापाची लाट पसरली आहे. अविनाश हा अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा असल्याने त्याच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, तरुणाने इतक्या टोकाचा निर्णय घेण्याआधी आपल्या कुटुंबियांचा आणि आई-वडिलांचा विचार करायला हवा होता, अशी चर्चा सध्या गावात सुरु आहे. आयुष्यात कितीही मोठं संकट कोसळलं किंवा काहीही झालं तरी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेवू नये. कारण आत्महत्या हे त्यावरील सोल्यूशन नाही. आत्महत्या ही पळवाट आहे. आत्महत्या केल्याने प्रश्न किंवा समस्या सुटत नाहीत. उलट अनेक प्रश्न निरुत्तरीत राहून जातात. अनेकांचं मोठं नुकसान होतं. विशेषत: कुटुंबियांचं खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन नेहमी केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.