मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबई-दहिसर प्रवास ठरला अखेरचा, खड्डा पाहून ब्रेक मारताच डंपरची धडक, नंतर चिरडलं, भयानक घटना

मुंबई-दहिसर प्रवास ठरला अखेरचा, खड्डा पाहून ब्रेक मारताच डंपरची धडक, नंतर चिरडलं, भयानक घटना

पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज धक्कादायक घटना घडली. नॅशनल पार्क ब्रिजजवळ खड्ड्यांमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज धक्कादायक घटना घडली. नॅशनल पार्क ब्रिजजवळ खड्ड्यांमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज धक्कादायक घटना घडली. नॅशनल पार्क ब्रिजजवळ खड्ड्यांमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

    मुंबई, 17 ऑगस्ट : मुंबईत खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. रस्त्यांवरील हे खड्डे आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठत आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज धक्कादायक घटना घडली. नॅशनल पार्क ब्रिजजवळ खड्ड्यांमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी चालकाने ब्रेक मारला. पण त्यानंतर पाठिमागून आलेल्या भरधाव वेगातल्या मालवाहू डंपरने त्यांना धडक देत जागेवरच चिरडलं. या दुर्घटनेत दुचाकीवर बसलेल्या एक पुरुष आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह रुग्णालयात पाठवले. तसेच डंपरचालकाला ताब्यात घेतलं. पोलीस मृतक व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (चित्रपटालाही लाजवेल इतका भयानक घटनाक्रम, प्रसिद्ध व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं? सांगली जिल्हा हादरला) संबंधित घटना ही आज दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. बाईकचालक मुंबईहून दहीसरच्या दिशेला निघाले होते. या दरम्यान नॅशनल पार्क हायवे ब्रिजवर एक मोठा खड्डा आल्याने बाईकचालकाने ब्रेक मारला. पण त्यांच्या पाठिमागे एक भरधाव डंपर येत होता. या भरधाव डंपरने बाईकला जोरात धडक दिली. त्यामुळे बाईकचालक आणि त्याच्यासोबत असलेली महिला रस्त्यावर पडले. त्यानंतरही त्यांच्यावरील संकट कमी झालेलं नव्हतं. गाडी नियंत्रणाबाहेर गेल्याने डंपर चालकाने भरधाव डंपर त्या दोघांवर चालवून नेला आणि त्यांना चिरडलं. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने कस्तुरबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेतील डंपरचा MH 02 ER 5461 असा नंबर आहे. तर अपघातग्रस्त दुचाकीचा Mh 04 HL 6804 असा नंबर आहे. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. डंपरचालकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी काही प्रत्यक्षदर्शींनी केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Accident, Crime, Crime news, Mumbai

    पुढील बातम्या