बीड, 12 नोव्हेंबर : बीड (beed) जिल्ह्यात विविध ठिकाणी दोन 16 वर्षीय अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच दिवशी दोन मुलीच्या आत्महत्या (commit suicide) केल्यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. एकीने गळफास तर दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारून जीवन यांत्रा संपवली.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील नेकनूर आणि केज तालुक्यात या दोन्ही आत्महत्याच्या घटना घडल्या आहे. नेकनूरमध्ये एकीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर केज तालुक्यातील मस्साजोग येथे दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
रूपाली रमेश मुळे (वय -16 रा. नेकनूर) आणि कोमल गोविंद गायकवाड (वय 16 रा. मस्साजोग) अशी आत्महत्या केलेल्या दोन मुलींची नावे आहेत. कोमल गायकवाड या मुलीने घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
Corona Alert! गेल्या 24 तासांत 500 जणांचा मृत्यू, या राज्यांत वाढतंय टेन्शन
या दोन्ही मुलींनी आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालं नसून याप्रकरणी नेकनूर व केज पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
कतरिना कैफसोबत लग्नाच्या चर्चेदरम्यान, विकी कौशलनं केला आपल्या आवडत्या मुलीचा...
दरम्यान, सध्या तरूण-तरुणींच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने तरुण पिढीत निर्णय क्षमता आणि अडचणींवर मात करण्याची क्षमता कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर वैचारिक क्षमता देखील कमी होत चालल्याने क्षणभराचाही विचार न करता थेट आत्महत्येचा पर्याय सध्याची तरुण पिढी निवडत आहे. त्यामुळे त्यांना योग्य वयात योग्य मार्गदर्शनाची मिळण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.