मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /पुन्हा Corona Alert! गेल्या 24 तासांत 500 जणांचा मृत्यू, या राज्यांत वाढतंय टेन्शन

पुन्हा Corona Alert! गेल्या 24 तासांत 500 जणांचा मृत्यू, या राज्यांत वाढतंय टेन्शन

देशातील कोरोना रुग्णांची (More than 500 corona deaths in last 24 hours) संख्या कमी होत असली तरी कोरोना बळींची संख्या वाढत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

देशातील कोरोना रुग्णांची (More than 500 corona deaths in last 24 hours) संख्या कमी होत असली तरी कोरोना बळींची संख्या वाढत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

देशातील कोरोना रुग्णांची (More than 500 corona deaths in last 24 hours) संख्या कमी होत असली तरी कोरोना बळींची संख्या वाढत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: देशातील कोरोना रुग्णांची (More than 500 corona deaths in last 24 hours) संख्या कमी होत असली तरी कोरोना बळींची संख्या वाढत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. देशात गेल्या 24 तासांत 501 रुग्णांचा मृत्यू झाल्याची (Alarming Corona cases) नोंद झाली आहे. मृतांच्या आकडेवारीनं 500 चा आकडा ओलांडल्यामुळे चिंता (New corona digits) वाढत असल्याचं चित्र आहे.

आकडेवारीची चिंता

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं देशात धुमाकूळ घातला आहे. दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्याचं चित्र होतं. मात्र दिवाळीनंतर आता अचानक दैनंदिन मृत्यूंची संख्या 500 च्या वर गेल्यामुळे चिंता वाढल्याचं चित्र आहे.

ताजी आकडेवारी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 12,516 नव्या कोरोना केसेसची नोंद झाली आहे. यानंतर देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,44,14,186 एवढी झाली आहे. त्याशिवाय ऍक्टिव्ह केसेसची संख्या कमी झाली असून 1,37, 416 झाली आहे. गेल्या 267 दिवसांतील हा निचांक आहे.

गुजरातमध्ये वाढली चिंता

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. दिवाळीच्या काळात बाजारात झालेल्या गर्दीचा परिणाम दिसायला सुरुवात झाला असून एका दिवसांत गुजरामध्ये 42 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णांची संख्या ही 10 पेक्षाही कमी झाली होती. आता हा आकडा वाढत वाढत 42 वर पोहोचला आहे.

हे वाचा- भारतासोबतच्या संबंधाबाबत तालिबाननं केलं मोठं विधान, प्रवक्त्यानं म्हटलं...

कुठल्या राज्यात काय स्थिती

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 997 नवे रुग्ण समोर आले असून 28 जणांचा बळी गेला आहे. तर 1016 जण रिकव्हर होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 66,21, 420 झाली आहे. तर राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत केवळ 40 नवे रुग्ण आढळले असून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

First published:
top videos

    Tags: Corona, Gujarat, महाराष्ट्र