तुकाराम मुंढेंनी घोटाळा केला, महापौर संदीप जोशींची न्यायालयात धाव

तुकाराम मुंढेंनी घोटाळा केला, महापौर संदीप जोशींची न्यायालयात धाव

तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकवरीवरुन काढून टाकलं होतं.

  • Share this:

नागपूर, 10 जुलै : नागपूर महापालिकेत आयुक्त विरुद्ध महापौर असा सामना रंगला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.  तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महापौर संदीप जोशी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

महापौर संदीप जोशी यांचा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जात स्मार्ट सिटीतील घोटाळ्याबाबत तुकाराम मुंढेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांच्यासह आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, असा आरोप जोशी यांनी केला असून त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीने विष प्राशन करून केली आत्महत्या, उस्मानाबादेत खळबळ

दरम्यान, 9 जुलै रोजी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आयुक्त तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावली आहे. तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकवरीवरुन काढून टाकलं होतं. पण तुकाराम मुंढे स्वत: स्मार्ट सिटीचे नियमानुसार सीईओ झाले नव्हते. मग त्यांनी सात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कसं काढलं? अशाप्रकारची याचिका सात कर्मचाऱ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

आग लागलेल्या इमारतीवरून खाली पडला 3 वर्षांचा चिमुरडा, हिरोसारखा आला तरूण

15 दिवसांत त्यांना यावर उत्तर द्यायचं आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील श्रीरंग भांडारकर यांनी दिली आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांना दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस पाठवली आहे. महापालिकामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याचं एका महिला अधिकारीनं महिला आयोगाला दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Published by: sachin Salve
First published: July 10, 2020, 11:34 AM IST

ताज्या बातम्या