उस्मानाबाद, 10 जुलै : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित संशयित व्यक्तीला क्वारंटाइन करण्यात आले होते. क्वारंटाइन असताना या व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. येडशी गावातील सरपंच यांच्यासह बार्शी तालुक्यातील पांगरी गावातील 3 जण व येडशी गावातील 6 जण असे 9 जण हे पास काढून तिरुपती दर्शनासाठी गेले होते. गावात परत येताच या 6 लोकांना गावातील जिल्हापरिषद च्या शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. हॉस्पिटलमधून कोरोनाबाधित पळाला आणि फुटपाथवर झोपला, काही वेळाने झाला मृत्यू मात्र, तीन दिवसांपूर्वी यातील एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याला तात्काळ उस्मानाबाद येथील प्लस येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र तब्येत खालावल्याने त्याला पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले असता त्याचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरती अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एक तर मंदीर बंद असताना हे देवदर्शनासाठी कसे गेले? त्यांना पास कसा मिळाला? आणि त्यातच रुग्ण हा क्वारंटाइन असताना त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे त्याला विष कुठून मिळाले. या सारखे अनेक प्रश्न उपस्थिती झाले आहे. या तरुणाने नेमकी आत्महत्या का केली याचे ही कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही. भोसरीत पगार न दिल्याने सुपरवायझरची आत्महत्या दरम्यान, ठेकेदाराने पगार न दिल्याने बांधकाम साईटवर काम करणाऱ्या सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई)च्या परिसरात ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. 45 वर्षीय रवींद्र सिंग असं गळफास घेऊन मृत पावलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रवींद्र सिंग हे सीएमई येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करीत होते. त्यांनी गुरुवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘…अन्यथा भारतात सापडणार दररोज 2,87,000 कोरोना रुग्ण’, MIT संशोधकांचा दावा पोलिसांना घटनस्थावर एक चिठ्ठी मिळून आली आहे. यामध्ये ठेकेदाराने पगार न दिल्याने आत्महत्या करीत असल्याचं म्हटलं आहे. रवींद्र यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.