'मुंबईची लोकल सुरू करा, अन्यथा...' डबेबाल्यांनी सरकारकडे मोठी मागणी

'मुंबईची लोकल सुरू करा, अन्यथा...' डबेबाल्यांनी सरकारकडे मोठी मागणी

मुंबईच्या डबेवाल्यांकडून सरकारकडे महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : कोराना या आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला तसा 19 मार्चपासुन मुंबईत डबे पोहचवण्याचा व्यवसाय बंद आहे. पुढे लॉकडाऊन झाले ते अजूनही सुरुच आहे. गेली साडेपाच महीने डबेवाल्यांना रोजगार नाही. रोजगार नसल्यामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांकडून सरकारकडे महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई थोडी-थोडी पूर्व पदावर येऊ पाहाते आहे. काही शासकीय, निमशासकीय, तसेच कार्पोरेट कार्यालये चालू होत आहेत. त्यामुळे जसे कर्मचारी कामाला बाहेर पडत आहेत. तसा डब्यांसाठीदेखील फोन येत आहे. हे चाकरमानी आपल्या डबेवाल्याला फोन करून डबे पोहच करायला सांगत आहे. पण लोकलसेवा जोपर्यंत पुर्णपणे सुरू होत नाही तोपर्यंत डबेवाला कामावर रूजू होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबईची लोकलसेवा सुरू करा अथवा डबेवाल्यांना महिना किमान 3 हजार रूपये अनुदान द्या अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांनी केली आहे.

'बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी...' रोहित पवारांचा आशिष शेलारांना टोल

मुंबईतील लोकल सेवा बहाल करण्यात यावी किंवा मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोहचवण्याची सेवा आत्यावश्यक सेवा मानून त्यांना लोकलने प्रवास करू देण्यात यावा अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची लोकलसेवा सुरू करा अथवा डबेवाल्यांना महिना किमान 3 हजार रूपये अनुदान द्या अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, देशाची आर्थिक बाजू आणि उद्योगांवर होत असलेल्या परिणामामुळे केंद्र सरकारने काही अटी शिथिल केल्या आहे. त्यामुळे राज्याअंतर्गत वाहतूक आता मोकळी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिना आता संपत आला आहे, त्यामुळे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात लॉकडाउनचे बरेच निर्णय मागे घेतले जाण्याची चिन्ह आहे.

ऑगस्ट अखेरीस कोरोनाचा कहर, वाचा 24 तासांतील रेकॉर्डब्रेक आकडेवारी

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील लोकल सेवा ही सर्वसामान्यांसाठी अजूनही बंदच आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल वाहतूक सुरू आहे. लोकल सेवा सुरू झाली तर मुंबई पूर्वपदावर येईल, असा सूर आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू करायची तर नेमके काय करावे लागले, याचीही चर्चा केली जाणार आहे. लोकल सेवा सुरू झाली तर कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती सरकारला आहे. त्यामुळे अद्याप लोकल सेवा ही अत्यावश्यक म्हणून चालवली जात आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 29, 2020, 11:14 AM IST

ताज्या बातम्या