जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / देवदर्शनावरून येताना काळाचा घाला, विचित्र अपघातात मुलीसमोर आई-वडिलांचा मृत्यू

देवदर्शनावरून येताना काळाचा घाला, विचित्र अपघातात मुलीसमोर आई-वडिलांचा मृत्यू

इंदापूर हद्दीत आल्यानंतर मार्गावर गतीरोधक आला होता. त्यामुळे कुलकर्णी यांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला

इंदापूर हद्दीत आल्यानंतर मार्गावर गतीरोधक आला होता. त्यामुळे कुलकर्णी यांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला

इंदापूर हद्दीत आल्यानंतर मार्गावर गतीरोधक आला होता. त्यामुळे कुलकर्णी यांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला

  • -MIN READ
  • Last Updated :

सोलापूर, 21 मार्च :  सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune highway) विचित्र अपघात घडला आहे. गतीरोधक आल्यामुळे चारचाकी कारने वेग कमी केला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने कारला जोराची (car accident) धडक दिली. या अपघातात पती आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे. जखमी अवस्थेत पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोलापूर-पूणे बाह्यवळण महामार्ग डोंगराई सर्कल इथं शनिवारी रात्री 9 वाजेच्य सुमारास ही घटना घडली.  संजीव दत्तात्रय कुलकर्णी हे आपल्या पत्नी सुखदा संजीव कुलकर्णी  आणि मुलगी अनघा हे तिघे जण कारने अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून अक्कलकोटवरून पुण्यात येत होते. इंदापूर हद्दीत आल्यानंतर मार्गावर गतीरोधक आला होता. त्यामुळे कुलकर्णी यांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला. त्यामुळे त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार समोर असलेल्या टेम्पोवर जाऊन आदळली. या अपघातात संजीव दत्तात्रय कुलकर्णी (वय 58) यांचा जागीत मृत्यू झाला. तर त्याची पत्नी सुखदा संजीव कुलकर्णी या जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने ससुन रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले होते. पण, वाटेतच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघानंतर घटनास्थळावरून ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे.  या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार ट्रॅक ड्रायव्हरचा शोध घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident , pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात