Home /News /sport /

हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये दिग्गज बॉस्केटबॉलपटूसह 13 वर्षांच्या लेकीचा मृत्यू! क्रीडा विश्वात हळहळ

हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये दिग्गज बॉस्केटबॉलपटूसह 13 वर्षांच्या लेकीचा मृत्यू! क्रीडा विश्वात हळहळ

दिग्गज बॉस्केटबॉलपटू कोबी ब्रायंट यांचा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला.

    कॅलिफोर्निया, 27 जानेवारी : दिग्गज बॉस्केटबॉलपटू कोबी ब्रायंट यांचा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. कोबी ब्रायंट या दिग्गज बॉस्केटबॉलपटूच्या मृत्यूनंतर क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. 41 वर्षीय कोबीसह त्याच्या 13 वर्षांच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. लॉस एंजलिसपासून 65 किमी अंतरावर कोबी ब्रायंटच्या मालकीच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. त्यानंतर आग लागून हे हेलिकॉप्टर झाडांमध्ये कोसळलं. भयंकर मोठ्या आगीमुळं बचाव पथकाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमध्ये कुणीही वाचू शकलं नाही. या अपघातात कोबी ब्रायंटसह त्याची 13 वर्षांची मुलगी आणि 9 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. कोबी ब्रायंटने आपल्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले. कोबी ब्रायंटने नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनकडून खेळताना 5 स्पर्धाही जिंकल्या. कोबी त्याच्या करिअरमध्ये 18 वेळा 'एनबीए ऑल स्टार' ठरला. तर, 2016मध्ये तिसऱ्या सर्वात मोठ्या ऑल स्टार खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली. कोबी ब्रायंटने 2012 आणि 2008च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी दोन सुवर्णपदकेही जिंकली होती. कोबी ब्रायंट यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तर बराक ओबामा यांच्यासह अनेक क्रीडा विश्वातील दिग्गजांनी ट्विटरवर हळहळ व्यक्त केली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या