युरोपातील संसदेत CAA विरोधात प्रस्ताव; भारताने सांगितलं, ही आमची अंतर्गत बाब

युरोपातील संसदेत CAA विरोधात प्रस्ताव; भारताने सांगितलं, ही आमची अंतर्गत बाब

युरोपातील संसदेत बुधवारी CAA वर चर्चा होणार असून याच्या एक दिवसानंतर मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले.

  • Share this:

लंडन, 27 जानेवारी : केंद्राने देशभरात CAA लागू केल्यापासून विरोध प्रदर्शन सुरू आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा यासाठी CAA विरोधात अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आता तर हा मुद्दा परदेशातही चर्चिला जात असून युरोपातील संसदेत या कायद्यावर चर्चा केली जाणार आहे. मात्र भारताने युरोपातील संसदेवरील चर्चेवर नाराजी व्यक्त केली आहे. युरोपातील संसद (European Parliament) भारताच्या नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात (Citizenship Act) त्यांच्या काही सदस्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान करणार आहेत. युरोपातील संसदेत या आठवड्याच्या सुरुवातीला युरोपियन युनायटेड लेफ्ट (European United Left) नॉर्डिक ग्रीन लेफ्ट (Nordic Green Left) यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार बुधवारी CAA वर चर्चा होणार असून याच्या एक दिवसानंतर मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले.

मात्र भारताने युरोपातील या चर्चेवर नाराजी व्यक्त केली आहे. CAA हा पूर्णत: भारताची अंतर्गत बाब आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CAA संदर्भात प्रस्ताव व पूर्ण आकलन करुन घेण्यासाठी युरोपातील संघ भारताशी संवाद साधतील, असा भारताचा विश्वास आहे.

प्रस्तावातील काही मुद्दे

CAA भारतातील नागरिकत्व ठरविण्याच्या पद्धतीत धोकादायक बदल करेल. यामुळे नागरिकत्व नसलेल्या लोकांबाबत मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात CAA लागू करण्यात आला होता, त्यामुळे देशभरात विरोध प्रदर्शन सुरू आहे. मात्र यावर भारताचे म्हणणे आहे की, CAA कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही. तर शेजारीला देशांमध्ये त्रास सहन करणाऱ्या अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणे आणि त्यांना नागरिकत्व देण्यासाठी CAA आणण्यात आला आहे.

अन्य बातम्या

मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पंकजा मुंडे आज उपोषण करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: iucaaun
First Published: Jan 27, 2020 08:59 AM IST

ताज्या बातम्या