मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बुलढाण्यात वाघाची दहशत कायम; शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय

बुलढाण्यात वाघाची दहशत कायम; शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय

वाघाच्या धास्तीने शाळा महाविद्यालय बंद, चार दिवसांपासून बुलढाण्यात दहशत कायम

वाघाच्या धास्तीने शाळा महाविद्यालय बंद, चार दिवसांपासून बुलढाण्यात दहशत कायम

Tiger spotted in buldhana: बुलढाण्यात शनिवारी वाघ दिसून आला होता. या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत मात्र, अद्यापही वनविभागाला यात यश आलेले नाहीये.

  • Published by:  Sunil Desale

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलढाणा, 7 डिसेंबर : बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये (Khamgaon Buldhana) शनिवारी एका वाघाने (Tiger) संचार केल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद (Tiger caught in CCTV) झालं. त्यानंतर वनविभागाने उशीरा कारवाई करत वाघाला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं. मात्र अंधार्‍या रात्री वाघ वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झाला आहे. त्यानंतर हा वाघ शहरात आहे किंवा शहराच्या बाहेर गेला याचा थांगपत्ता लागत नाहीये. वन विभागाकडून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. (Buldhana Khamgaon school closed due to tiger terror)

या सर्व घडामोडीत खामगाव शहरातील ज्या भागात हा वाघ दिसला होता त्या परिसरातील काही किलोमीटर मधल्या शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय शाळांकडून घेण्यात आला आहे. आधीच कोरोनामुळे या शाळा बराच काळ बंद होत्या, आता पुन्हा वाघाच्या दहशतीमुळे या शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. खामगाव शहरातील ज्या भागात वाघाचा संचार आढळून आला होता त्या भागातील या शाळा-महाविद्यालय आता वाघ जेरबंद होईपर्यंत बंद असणार आहेत.

त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर वाघाचा शोध घेऊन खामगावकरांना वाघाच्या दहशतीतून मुक्त करावे अशी मागणी होताना दिसत आहे. वनविभाग वाघ पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असले तरी वाघ पकडल्याशिवाय खामगावातील शाळा सुरू होणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता परिसरातील शाळांकडून घेण्यात आली आहे.

वाचा : Selfie बेतली जीवावर; भिवंडीत इमारतीवरुन पडून 13 वर्षीय मुलाने गमावला जीव

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील वस्तीमध्ये वाघ शिरला होता. वस्तीत वाघ शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी वाघाला पाहिले असून डरकाडी फोडत वाघ हा मार्गक्रमण करीत आहे अशी माहिती वन विभागाला देण्यात आली. अद्याप या वाघाला पकडण्यात यश आले नाहीये. पट्टेदार वाघ शहरात शिरल्याने भीतीने वातावरण आहे.

वाघ हा गेल्या काही महिन्यां अगोदर यवतमाळच्या अभयारण्यामधून दाखल झाला होता. मध्यंतरी हा वाघ बुलढाण्याच्या अभयारण्यामधून दिसेनासा झाला होता, हा तोच वाघ असेल का याबाबत वन विभाग शोध घेत आहेत.

नगरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, भरवस्तीत चौघांवर हल्ला

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरवस्तीत 5 डिसेंबर रोजी बिबट्या शिरला होता. या बिबट्याने चौघांवर व्यक्तीवर हल्ला केला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चौघेजण जखमी (4 injured in leopard attack) झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा LIVE VIDEO समोर (Leopard attack live video) आला होता. या व्हिडीओत दिसत आहे की, बिबट्या त्या इसमावर झटप घेतो.

First published:

Tags: Buldhana news, School, Tiger