मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

Leopard attack video: अहमदनगरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, भरवस्तीत चौघांवर हल्ला, LIVE VIDEO

Leopard attack video: अहमदनगरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, भरवस्तीत चौघांवर हल्ला, LIVE VIDEO

नगरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, भरवस्तीत चौघांवर हल्ला, LIVE VIDEO

नगरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, भरवस्तीत चौघांवर हल्ला, LIVE VIDEO

Leopard attack Live Video: बिबट्याने चौघांवर व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

अहमदनगर, 5 डिसेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात (Shrirampur City Ahmednagar) भरवस्तीत बिबट्या शिरला आहे. या बिबट्याने चौघांवर व्यक्तीवर हल्ला केला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चौघेजण जखमी (4 injured in leopard attack) झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा LIVE VIDEO समोर (Leopard attack live video) आला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, बिबट्या त्या इसमावर झटप घेतो. (Leopard attack on people in Ahmednagar, incident caught in mobile camera) श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीत बिबट्या शिरला आहे. भरवस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकही चकीत झाले आणि धावपळ सुरू झाली. याच दरम्यान बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले आहेत. वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या शहरातील वस्तीत शिरल्याची माहिती तात्काळ पोलीस आणि वन विभागाला देम्यात आली आहे. ही माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वन विभागाकडून या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वाचा : शेवगाव तहसील कार्यालयासमोर तरुणाची आत्महत्या, Suicide note मधून धक्कादायक माहिती समोर बुलढाण्यातील खामगावमध्ये वस्तीत शिरला वाघ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील वस्तीमध्ये वाघ शिरला आहे. वस्तीत वाघ शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी वाघाला पाहिले असून डरकाडी फोडत वाघ हा मार्गक्रमण करीत आहे अशी माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. अद्याप या वाघाला पकडण्यात यश आले नाहीये. पट्टेदार वाघ शहरात शिरल्याने भीतीने वातावरण आहे. वाघ हा गेल्या काही महिन्यां अगोदर यवतमाळच्या अभयारण्यामधून दाखल झाला होता. मध्यंतरी हा वाघ बुलढाण्याच्या अभयारण्य मधून दिसेनासा झाला होता, हा तोच वाघ असेल का याबाबत वन विभाग शोध घेत आहेत. सिंधुदुर्गात बिबट्याची दहशत; घराबाहेरील कुत्र्याचा पाडला फडशा सिंधुदुर्गात (Sindhudurg) बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना (Leopard attack on dog) समोर आली आहे. ही संपूर्ण घटना घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद (leopard attack caught in CCTV) झाली आहे. सिंधुदुर्गातील मालवण विरण बाजार येथे 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्री विजय बेलवलकर यांच्या घराच्या अंगणात येऊन बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. विरण बाजार परीसरात भरवस्थीत बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत अंगणात बसलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला बिबट्याने घराच्या अंगणात बसलेल्या महिलेवर हल्ला केल्याची घटना सप्टेंबर महिन्यात मुंबईत घडली होती. सुदैवाने या हल्ल्याच महिलेचा जीव बचावला आहे. दरम्यान या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भय परसलं होतं. या पूर्वी 4 वर्षांच्या रोहितवर एका बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये रोहितच्या वडिलांनी बिबट्याला हाकलून लावले. त्यामुळे आरे कॉलनीत राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुधवारी (29 सप्टेंबर) झालेल्या हल्ल्याच्या व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत दिसत होते की, एक महिला घराच्या अंगणात बसली आहे. याचवेळी मागून बिबट्याच्या डोळे चमकताना दिसत आहे. बिबट्या मागून महिलेवर हल्ला करतो. महिला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू करते. यावेळी तिच्या हातात काठी असते आणि ती ही काठी बिबट्यावर उगारू लागते. त्यामुळे बिबट्या जरा मागे होते. दरम्यान बिबट्या तेथून पळ काढतो. तेवढ्यात घरातील मंडळी बाहेर येतात.
First published:

Tags: Ahmednagar, Leopard, Live video

पुढील बातम्या